शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

वादळाचे यूपीत १७ बळी; असंख्य घरे उद्ध्वस्त, झाडे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:24 AM

धुळीचे वादळ व जोरदार पावसाचा तडाखा याने उत्तर प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळपासून आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून, ११ जण जखमी झाले.

लखनौ : धुळीचे वादळ व जोरदार पावसाचा तडाखा याने उत्तर प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळपासून आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून, ११ जण जखमी झाले. या वादळामुळे अनेक झाडे कोलमडली, विजेचे खांब कोसळले आणि अनेक ठिकाणी विजाही कोसळल्या. काही ठिकाणी वाऱ्याने घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. उत्तराखंडातही पाऊ स कोसळत असून, येत्या ४८ तासांत ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.घरे कोसळल्याने आणि झाडे अंगावर पडल्यानेच हे मृत्यू झाले असल्याचे राज्याच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यापैकी ९ मृत्यू मोरादाबाद जिल्ह्यातील आहेत. संभळ जिल्ह्यात तीन जण मृत्युमुखी पडले असून, मेरळ व मुझफ्फरनगरमध्ये प्रत्येकी दोन जण मरण पावले आणि अमरोहा जिल्ह्यात एक जण अंगावर झाड कोसळून मरण पावला. धुळीच्या वादळाचा त्रास होऊ नये, यासाठी अमरोहा जिल्ह्यातील तरुण झाडाखाली उभा होता. ते झाडच नेमके त्याच्या अंगावर कोसळले. जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईही दिली जाणार आहे. ज्यांनी घरे उद्ध्वस्त झाली, त्याची पाहणी करून त्यांना मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)उत्तराखंडात ढगफुटीउत्तराखंडमधील टिहरी, उत्तरकाशी, पौडी व नैनिताल या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी संध्याकाळीही ढगफुटी झाली. त्यानंतर डेहराडूनमध्ये मुसळधार वृष्टी झाली. या चारही जिल्ह्यातील नद्या भरून वाहू लागल्या आहेत आणि कित्येक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक रस्तेही पावसाने वाहून गेले असून, काही गावांचा त्यामुळे संपर्कच तुटला आहे. बद्रीनाथ हायवेही काल संध्याकाळपासून बंद करण्यात आला. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाºयांना सतर्कतेचे आदेश दिले असून, एसडीआरएफ व एनडीआरएफच्या तुकड्या या चार जिल्ह्यांत रवाना करण्यात आल्या आहेत. डेहरादून, उधमसिंहनगर, हरिद्वार व पौडी गढवालमध्ये ताशी ७0 ते ८0 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि डोगराळ भागात अतिवृष्टी होऊ शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.दिल्लीलाही फटका : दिल्लीमध्येही कालपासून वेगाने वारे वाहत असून, तिथे आजही अनेक भागांत धुळीचे वादळ झाले. त्यामुळे काही भागांतील वीजच बेपत्ता झाली होती. दिल्लीत एक जण या वादळात मरण पावला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश