१७... यात्रा... कुही
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
कुही
१७... यात्रा... कुही
कुहीतालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावरील श्रीक्षेत्र आंभोरा येथे महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी श्री चैतन्येश्वराचे दर्शन घेतले. येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली होती. देवस्थान व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर ठवकर, सचिव केशवराव वाडीभस्मे, नरेश ठवकर, मदन खडसिंगे यांच्या नेतृत्वात स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती. तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी देवस्थान व्यवस्थापन समिती व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यात्रा आयोजनाचा आढावा घेतला. यावेळी खंडविकास अधिकारी बी.एच. भरक्षे, तालुका आरोग्य अधिकारी नरेंद्र पटले, पंचायत विस्तार अधिकारी सुनील पाटील, ग्रामसेवक एस.एस. शंभरकर, एच.वाय. चंदनकर यांच्यासह अन्य कर्मचारी सदर बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, वेलतूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. या यात्रेत ठिकठिकाणांहून आलेल्या दिंड्या व भजन मंडळे सहभागी झाली होती. दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. भाविकांनी श्री चैतन्येश्वरासोबतच स्वामी हरिनाथ व त्यांचे शिष्य रामचंद्र यांची समाधी, विठ्ठल रुक्मिणी, उरकुडा महाराज, स्वामी रंगलाल महाराज हनुमंत, सतीमाता यांचेही दर्शन घेतले. आंभोरा येथे येण्यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा बसेस व्यवस्था केली होती.--------तारणाकुही तालुक्यातील तारणा येथील धम्मखिंड पर्वतावरील प्रसिद्ध महादेवाच्या मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी येणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. तारणा येथे येण्यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा बसेस सोडल्या होत्या. कुही तालुक्यातील कुही वडोदा मार्गावरील सावरी नजीकच्या दातपाडी येथील महादेव मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. या दोन्ही ठिकाणी मूलभूत सुविधांची निर्मिती केली होती. ***----