शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१७ धरणे आंदोलन जोड

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

पुरोगामी शिक्षक संघटना नागपूर : महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्र आर.टी.ई. (राईट टू एज्युकेशन) कायदा लागू करावा, शिक्षण क्षेत्र अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट नसावी यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात येत आहे.प्रमुख मागण्या : निवडणूक आचारसंहिता व न्यायालय स्थगिती आदी ...


पुरोगामी शिक्षक संघटना
नागपूर : महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्र आर.टी.ई. (राईट टू एज्युकेशन) कायदा लागू करावा, शिक्षण क्षेत्र अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट नसावी यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या : निवडणूक आचारसंहिता व न्यायालय स्थगिती आदी कारणांमुळे रखडलेले २०१३ चे समायोजन सप्टेंबर २०१४ च्या शिक्षक निश्चितीवर करण्यात यावे, स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी शिपाई हे पद मंजूर करावे, बदल्यांसंदर्भातील धोरणात बदल करण्यात यावा, शालेय पोषण आहार यंत्रणेमधून मुख्याध्यापकांना पूर्णत: वगळण्यात यावे, गुणवत्ता विकास कार्यक्रम शासनस्तरावरून एकच व स्थायी स्वरुपाचा राबवावा, आरटीईनुसार राज्यभर कामाचे दिवस व सुट्यांचे दिवस समान असावे, सर्व पात्र शिक्षकांना निवडश्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील कार्यकर्ते : सतीश बानाईत, विजय भोगेकर, विनायक घटे, गंगाधर गंगनाळे, महादेव पेंढे, एकनाथ कराड, रवी शेंडे, निकेत हुमणे, दादाराम कागरे, बट्टलवाड यादव, मारुती सावंत, सुरेश लांजेवार, लालबहादुर काळबांडे, विजय सुरला, हेमंत वागदरकर, इसराईल पठाण, शैलेश बरडे, सुमन कोलगंटीवार आदी.
राज्य शासकीय कर्मचारी महासंघ
नागपूर : बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
प्रमुख मागण्या : लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदनाम बदलविण्यात यावे, कमी केलेले पदे वाढवावी, सीईआरटी वरील कर्मचाऱ्यांना नियमित आस्थापनेवर नियुक्ती करावे, २००५ नंतर नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचऱ्यांचा मतदारसंघ असावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघटनेचे सरचिटणीस सूर्यकांत इंगळे कार्यकर्ते : दिगांबर कोकरे, अनिल कुलकर्णी, नंदकुमार बिडीसकर, दिगांबर कांबळे, नंदकुमार साने, चंद्रशेखर जरोदे, अनंत मराठे, ज्ञानेश्वर आसरे, प्रमोद कावळे, नवनाथ कुचरे, प्रवीण जुमडे, सोनाजी काकडे, दिलीप कल्ले आदी.