शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

यमुना एक्स्प्रेस वेवरचे 6 बांधकाम व्यावसायिकांचे 17 प्रकल्प रद्द

By admin | Updated: April 19, 2017 20:38 IST

इंडस्ट्रिएल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA)ने यमुना एक्स्प्रेस वेवर सुरू असलेल्या 6 बिल्डरांच्या 17 प्रकल्पांचं काम रद्द केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - इंडस्ट्रिएल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA)ने यमुना एक्स्प्रेस वेवर सुरू असलेल्या 6 बिल्डरांच्या 17 प्रकल्पांचं काम रद्द केलं आहे. यात गौर सन्स, अजनारा, जेपी ग्रुप आणि ओरिस, इन्फ्रा सारख्या बिल्डरांच्या प्रोजेक्टचा समावेश आहे. मात्र या प्रकल्पांचं बांधकाम बंद झाल्यानं अनेक कामगारांच्या कुटुंबीयांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी आराखडा न आखता हे प्रकल्प मंजूर करून घेतले होते. या प्रकल्पांना सपा आणि बसपाचं सरकार असताना मंजुरी देण्यात आली होती. मात्र योगी सरकारनं हे प्रकल्प रद्द केले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना इमारतीच्या आराखड्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी आता नव्यानं निविदा टाकावी लागणार आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी काही प्लॅटची आधीच बुकिंग करून ठेवली होती. दुसरीकडे जेपी इन्फ्राटेकला यमुना एक्स्प्रेस वे बनवल्याच्या मोबदल्यात सरकारी करारानुसार एक्स्प्रेस वेलगतची 500 हेक्टर जमीन विकसित करण्यासाठी दिली होती. मात्र नकाशा मंजूर केल्यानंतर प्राधिकरणानं इमारतीच्या बांधकामावर आक्षेप नोंदवला आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी प्राधिकरणाच्या हरकतीचं उत्तर दिलं नाही. त्यांचा इमारतीचा आराखडा नियोजन विभागातच धूळ खात पडला. नियोजन विभागाच्या हरकतींना दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास इमारतीच्या बांधकामाचा नकाशा मंजूर होत नाही. तो रद्दबातल समजला जातो.