शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं मुस्लिम मुलाला जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 07:44 IST

पुन्हा एकदा जमावाकडून मारहाण; हल्लेखोरांचा शोध सुरू

कानपूर: जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं 16 वर्षीय मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली. बर्रामध्ये राहणारा मोहम्मद ताज शनिवारी नमाज अदा करून परतत होता. त्यावेळी त्याला काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. सोळा वर्षांचा मोहम्मद ताज शनिवारी नमाज अदा करण्यासाठी किडवाई नगरमध्ये गेला होता. नमाज अदा करुन परतत असताना दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन-चार जणांनी मोहम्मदला अडवलं. ओव्हरटेक केल्याच्या कारणावरुन अज्ञातांनी मोहम्मदसोबत वाद घातला. त्यानंतर त्यांनी मोहम्मदच्या डोक्यावर असलेल्या टोपीवर आक्षेप घेतला, अशी माहिती बर्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश कुमार सिंह यांनी दिली. अज्ञातांनी मोहम्मदला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं. मात्र त्यानं नकार दिला. यानंतर त्यांनी मोहम्मदला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. 'त्यांनी माझ्या डोक्यावरील टोपी काढली. मला जमिनीवर ढकलून दिलं आणि जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं. त्यानंतर मला प्रचंड मारहाण केली,' असं मोहम्मदनं पीटीआयला सांगितलं. या परिसरात टोपी घालण्यास मनाई असल्याचं अज्ञातांनी म्हटल्याचंही मोहम्मद म्हणाला. अज्ञातांकडून मारहाण सुरू असताना सुरुवातीला कोणीच मदत केली नाही, अशी व्यथा मोहम्मदनं मांडली. 'आधी मी दोन दुकानदारांकडे मदतीसाठी याचना केली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर काही वाटसरु माझ्या मदतीला धावले. त्यांना पाहताच अज्ञातांनी पळ काढला,' अशी आपबिती मोहम्मदनं सांगितली. या प्रकरणी कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. 

 

टॅग्स :Muslimमुस्लीम