शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

16 महिन्यामध्ये 19 वेळा गॅस सिलिंडरच्या दरात झाली वाढ, सर्वसामान्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 10:12 IST

सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 4 रूपये 50 पैशांनी वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 4 रूपये 50 पैशांनी वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत.विनाअनुदानित सिलिंडरसाठी 93 रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जेट इंधनच्या किंमतीतही 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 4 रूपये 50 पैशांनी वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत. आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी 93 रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जेट इंधनच्या किंमतीतही 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे. इतकंच नाही, तर विमानाचं तिकीटही महाग होणार आहेत. जुलै 2016 नंतर सरकारने 19 वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. 

गेल्यावर्षी जुलै महिन्यामध्ये सरकारने प्रत्येक महिन्यात किंमत वाढवून गॅस सिलिंडरवर देण्यात येणारं अनुदान संपवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत 19 वेळा किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती अनुदानित 14.2 किलोग्रॅमचा एक सिलिंडर 495 रूपये 69 पैशांना मिळेल. विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 93 रूपयांची वाढ होऊन त्याची किंमत आता 742 रूपये झाली आहे. यापूर्वी एक ऑक्टोबर रोजी यामध्ये 50 रूपयांची वाढ करून त्याची किंमत 649 रूपये करण्यात आली. 

गेल्या वर्षी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना प्रत्येक महिन्यात दरांमध्ये वाढ करायला सांगितलं होतं. पुढील मार्च महिन्यापर्यंत अनुदान संपवण्यासाठी सरकारने तशा सूचना दिल्या होत्या. हे धोरण लागू करायला सुरूवात केल्यापासून अनुदानित सिलिंडरच्या दरात आतापर्यंत 76 रूपये 51 पैशांनी वाढ झाली आहे. जून 2016 मध्ये याची किंमत 419 रूपये 18 पैसा इतकी होती.सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांची अधिसूचनेनुसार विमान इंधनच्या किंमतीत दोन टक्क्यांनी वाढ केली. ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत किंमतीमध्ये लागोपाठ चारवेळा वाढ करण्यात आली. पेट्रोलियम कंपन्यांच्या अनुसार विमान इंधनाची दिल्लीमध्ये किंमत 54,143 रूपये प्रति किलोलीटर झाली आहे. आधीची किंमत 53,045 रूपये प्रति किलोलीटर होती. म्हणजेत आताची किंमत 1098 रूपयांनी अधिक आहे. 

सरकारी पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी आणि एटीएफ (विमान इंधन) किंमतीत बदल करतात. मागील महिन्यातील तेलाची सरासरी किंमत आणि विदेशी मुद्रा विनिमय दरावर हे अवलंबून असतं. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरGovernmentसरकार