शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या रिंगणात १५८ उमेदवार करोडपती; ६१ जणांवर खटले, १५५ जण २५ ते ५० या वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:16 IST

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका ९ नोव्हेंबर रोजी होत असून, त्यासाठी १५८ करोडपती उमेदवार रिंगणात आहेत आणि ६१ जणांविरुद्ध फौजदारी खटले दाखल आहेत. हिमाचल प्रदेश इलेक्शन वॉच अ‍ॅण्ड असोसिएट्स फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मसने (एडीआर) ही माहिती दिली आहे.

शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका ९ नोव्हेंबर रोजी होत असून, त्यासाठी १५८ करोडपती उमेदवार रिंगणात आहेत आणि ६१ जणांविरुद्ध फौजदारी खटले दाखल आहेत. हिमाचल प्रदेश इलेक्शन वॉच अ‍ॅण्ड असोसिएट्स फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मसने (एडीआर) ही माहिती दिली आहे. रिंगणात असलेल्या ३३८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांतून हे समोर आले आहे.एकूण ३३८पैकी १५८ उमेदवार (४७ टक्के) उमेदवार करोडपती असून, उमेदवारांची सरासरी संपत्ती ४.०७ कोटी रुपये आहे. त्यात काँग्रेसच्या ५९, भाजपाच्या ४७ व बसपाच्या ६ जणांचा समावेश आहे. पाच जणांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. काँग्रेसचे उमेदवार जी.एस. बाली यांचे वार्षिक उत्पन्न ३.४२ कोटी रुपये आहे. अन्य कोट्यधीश उमेदवारांत राजेश शर्मा, भाजपाचे बलवीरसिंग वर्मा, महेंदर सिंह व मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)कोटीच्या कोटी उड्डाणेकाँग्रेसच्या ६८ उमेदवारांची सरासरी संपत्ती ८.५६ कोटी, तर भाजपाच्या ६८ उमेदवारांची सरासरी संपत्ती ५.३१ कोटी व बसपाच्या ४२ उमेदवारांची संपत्ती ४६.७८ लाख रुपये आहे. माकपच्या १४ उमेदवारांची सरासरी संपत्ती २.३१ कोटी, भाकपच्या ३ उमेदवारांची सरासरी संपत्ती ७४.६४ लाख आणि अपक्ष ११२ उमेदवारांची संपत्ती ३.२० कोटी रुपये आहे. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांची संपत्ती ८४ कोटी रुपये आहे.५५ लाख रुपये हस्तगत : निवडणुकीच्या घोषनेनंतर निवडणूक आयोगाने ५५ लाख रुपये रोख, २,३२२ लिटर दारू तसेच गांजा व ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. निवडणूक आयोगाने २०४ पथके तयार केली आहेत. प्रत्येक मतदारसंघात तीन पथके, तीन तपास पथके तैनात आहेत. या निवडणुकीसाठी एक प्राप्तिकर अतिरिक्त आयुक्त, सहा उपायुक्त व उप संचालक, १७ प्राप्तिकर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.गुन्हे दाखल झालेले३३८ उमेदवारांपैकी ६१ जणांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी ३१ जणांवर (९ टक्के) गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे आहेत. गुन्हे दाखल असणाºयांत काँग्रेसचे ६, भाजपाचे २३, बसपाचे ३, माकपचे १० आणि १६ अपक्ष आहेत.१२० उमेदवार५वी ते १२वी पासएकूण उमेदवारांपैकी १२० उमेदवार हे ५वी ते १२वीपास आहेत. तर, २१४ पदवीधर आहेत. एक उमेदवार निरक्षर असून एका उमेदवाराने आपली शैक्षणिक माहिती दिली नाही. १५५ उमेदवार २५ ते ५० या वयोगटातील आहेत. तर,१७९ उमेदवार ५१ ते ८० वयोगटातील आहेत. १९महिला उमेदवार निवडणूक लढवित आहेत.- पंतप्रधान मोदी व राहुल गांधी दोघेही या राज्यामध्ये सतत दौरे करून सभा घेत आहेत. मात्र भाजपाने येथे पूर्ण ताकद लावल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक