शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

१५० किमी वेग ऋषभ पंतला नडला; हरिद्वारमध्ये गाडीला अपघात, आईला ‘सरप्राइज’ महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 06:23 IST

सुदैवाने आगीत कार भस्मसात होण्यापूर्वीच ऋषभ पंत खिडकीची काच फोडून बाहेर आल्याने बचावला. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली/डेहराडून: क्रिकेटमध्ये एका क्षणाच्या दुर्लक्षानेही झेल सुटतो. यष्टिरक्षण करताना भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याला हा अनुभव अनेकवेळा आला असेल, परंतु शुक्रवारी पहाटे कार चालवताना गाडीचा वेग आणि क्षणभराची डुलकी पंतच्या जिवावर बेतता बेतता राहिली. दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची आलिशान कार दुभाजकावर आदळली, सुदैवाने आगीत कार भस्मसात होण्यापूर्वीच तो खिडकीची काच फोडून बाहेर आल्याने बचावला. 

आपल्या आईला अचानक भेट देऊन आश्चर्यचकित करण्यासाठी आपल्या मूळ गावी रुरकी येथे जात असलेला २५ वर्षीय ऋषभ अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मंगलौरमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. हरयाणा परिवहन मंडळाचा बसचा चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी ऋषभला जळत्या मर्सिडीज बेंझमधून बाहेर पडण्यास मदत केली, असे हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजय सिंग यांनी सांगितले. 

बरे होण्यास लागू शकतात ६ महिने ते वर्ष... 

रुरकी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पंतवर उपचार करणारे डॉ. सुशील नागर म्हणाले की, पंतला फ्रॅक्चर नसून गुडघ्याच्या स्नायूंना (लिगामेंट) दुखापत झाली आहे. त्यासाठी पुढील चाचण्या कराव्या लागणार आहेत. पूर्ण तंदुरुस्तीसाठी दोन ते सहा महिने लागू शकतात. दरम्यान, त्याला पूर्ण बरे होण्यासाठी ६ महिने ते एक वर्ष लागू शकेल, असा अंदाजही काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

लवकर बरा हो...

पंतच्या अपघातानंतर तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर संदेश टाकले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- अपघातामुळे वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंतच्या आईशी फोनवर बोलणी करून ऋषभ लवकर बरे होईल, असे म्हटले.

घरापासून केवळ १० किमीवर...

- कारमध्ये एकट्याच असलेल्या पंतला क्षणभर डुलकी लागली आणि १५० किलोमीटर वेगाने जाणारी कार दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. अपघाताचे ठिकाण त्याच्या घरापासून १० किलोमीटर अंतरावर राहिले होते. 

- ऋषभच्या मर्सिडीजने दुसऱ्या एका कारला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात समोर एक खड्डा आला. त्यामुळे त्याची कार ५ फुटांपर्यंत उसळून बसला धडकली... त्यानंतर दुभाजकावर धडकली. त्यामुळे आग लागली, असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला. 

नोटा रस्त्यावर विखुरल्या...

ऋषभ कारमधून उतरला तेव्हा त्याने पैशांनी भरलेली बॅगही बाहेर काढली. त्यावेळी काही नोटा रस्त्यावर विखुरल्या. हरयाणा परिवहन मंडळाच्या बसचालकाने नोटा जमा करून ऋषभला दिल्या, असे सांगण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rishabh Pantरिषभ पंत