शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘जेट’च्या विमानांत १५ किलो सामानाचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:48 IST

जेट एअरवेजने तुम्ही १५ जुलैपासून देशांतर्गत प्रवास करणार असाल, तुम्हाला तुमच्या बॅगमधील सामानावर नियंत्रण ठेवावे लागेल.

नवी दिल्ली : जेट एअरवेजने तुम्ही १५ जुलैपासून देशांतर्गत प्रवास करणार असाल, तुम्हाला तुमच्या बॅगमधील सामानावर नियंत्रण ठेवावे लागेल. सगळे सामान बॅगेत कोंबून चालणार नाही. जेट एअरवेजने बॅगची संख्या व वजनाबाबत नवे नियम लागू केले असून, आता १५ किलोपेक्षा अधिक सामान नेता येणार नाही.इकॉनॉमी क्लासचं तिकीट असलेल्या प्रवाशांना सोबत १५ किलो सामान असलेली एकच बॅग नि:शुल्क नेता येईल, असे जेट एअरवेजने स्पष्ट केले आहे. बिझनेस क्लासच्या प्रवाशांना १५ किलो वजनाच्या प्रत्येकी दोन बॅगांची मुभा असेल. तुम्ही जेटचे प्लॅटिनम कार्डधारकांनाही दोन बॅगा नेता येतील.तुमच्या बॅगमधील सामानाचे वजन १५ किलोपेक्षा अधिक असल्यास त्यावर किती अधिक शुल्क आकारले जाईल, हे जेटने स्पष्ट केलेले नाही. मात्र १४ जूनच्या आधी तिकीट काढलेल्या व १५ जुलैपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे नियम लागू नसतील. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बॅगेजच्या संख्येवर वर्षभरापूर्वीच बंधने घातली होती. परदेशामध्ये देशांतर्गत प्रवास करणा-यांना आधीपासून ही बंधने आहेत. >वेळेची होईल बचत, अधिक महसुलाचा प्रयत्न?प्रवाशांच्या बॅगची संख्या कमी झाल्यास चेकइनच्या वेळेला तसेच विमानातून उतरल्यावर बेल्टवरून सामान घेताना लागणारी वेळ कमी होईल. शिवाय अतिरिक्त बॅगा वा वजन असल्यास त्यावर भराव्या लागणा-या शुल्कामळे विमान कंपनीला अधिक महसूलही मिळू शकेल. जेट एअरवेजपाठोपाठ अन्य विमान कंपन्यांनीही असेच नियम लागू केल्यास आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज