शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

14th August: वेदना विसरू शकत नाही! 14 ऑगस्ट 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' मानला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 12:06 IST

14th August : India's Partition Horrors Remembrance Day फाळणीवेळी हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही रिपोर्टनुसार ही संख्या 10 ते 20 लाख एवढी होती. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध सर्वच होरपळले गेले. 14 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यंदाचा स्वातंत्र्य दिवसाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच 14 ऑगस्ट हा 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहीणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असे मोदी यांनी म्हटले आहे. (In memory of the struggles and sacrifices of our people, 14th August will be observed as Partition Horrors Remembrance Day: PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, फाळणीमध्ये विस्थापित व्हावे लागलेल्या आणि प्राण गमावलेल्या आमच्या लाखो बंधु-बहीणींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी आजचा दिवस  'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून मानला जाईल.आजचा हा दिवस, #PartitionHorrorsRemembranceDay आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही, तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावने आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे, असे मोदी म्हणाले. (14th August : India's Partition Horrors Remembrance Day)

भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र, इंग्रजांनी भारताला या स्वातंत्र्याचा आनंद फाळणीची मोठी किंमत मोजून दिले होते. 14 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान दोन भागात विभागले गेले होते. 15 ऑगस्टला सकाळी ट्रेनमधून, घोडे-खेचरांवरून आणि पायी लोक आपल्या मातृभूमीतून दुसऱ्या देशात जात होते. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या या लोकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले होते. 

फाळणीवेळी दोन्ही बाजुला हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही रिपोर्टनुसार ही संख्या 10 ते 20 लाख एवढी होती. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्ध सर्वच होरपळले गेले. 14 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात यापुढे हा दिवस 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून पाळला जाणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनPakistanपाकिस्तान