शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खेळताना बादलीत पडून 14 महिन्याच्या मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 10:08 IST

-  पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे-  पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी दिल्लीतील नांगलोई भागातील अमर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. सृष्टी असं त्या मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नावं आहे.घरच्यांनी बाथरूम तपासल्यावर ती बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडलेली दिसली

नवी दिल्ली, दि.27-  पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मुलगी असल्याची माहिती समोर येते आहे. नवी दिल्लीतील नांगलोई भागातील अमर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. सृष्टी असं त्या मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नावं आहे. घरातील सगळी लोक इतर कामात व्यस्त असताना ही घटना घडली आहे. ही मुलगी जेव्हा घरातील तिच्या खोलीमध्ये दिसली नाही तेव्हा तिला घरच्यांनी आजूबाजूला शोधलं पण ती सापडली नाही. त्यानंतर घरच्यांनी बाथरूम तपासल्यावर ती बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडलेली दिसली. तिच्या कुटुंबीयांनी तिला लगेचच उपाचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.

हॉस्पिटलकडून पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई आणि इतरांकडे चौकशी केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांगलोई भागातील अमर कॉलनीतील के-ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ महिन्यांची मुलगी गॅलरीमध्ये खेळत होती. त्यांच्या घरात दुरूस्तीचं काम सुरू होतं. सृष्टीची आई त्या कामाकडे लक्ष देत होती. तेव्हा खेळता खेळता सृष्टी बाथरूममध्ये गेली. कामात व्यस्त असल्याने सृष्टीच्या आईचं लक्ष तिच्याकडे गेलं नाही. काहीवेळानंतर जेव्हा तिच्या आईने पाहिलं तेव्हा ती गॅलरीत नव्हती, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सृष्टीचं कुटुंबीय तिच्या नावाने आवाज देऊन इमारतीच्या बाहेरपर्यंत आले होते. पण त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. सृष्टी कुठे तरी लपली असेल हा विचार करून त्यांनी घरातील प्रत्येक कोपरा पाहिला. त्यानंतर शेवटी बाथरूम तपासल्यानंतर सृष्टीचं डोकं भरलेल्या पाण्याच्या बादलीत डुबलेलं तिच्या घरच्यांना पाहायला मिळालं. दरम्यान, या प्रकरणाचा पुढचा तपास केला जातो आहे.