शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१४.५ लाख महिला न्यायाच्या प्रतिक्षेत; उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:31 IST

पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्कारपीडितेला न्याय देण्यासाठी देशभरातून मागणी वाढत असताना देशातील १४.५ लाख महिला न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पश्चिम बंगाल, महाराष्टÑ व उत्तर प्रदेशात यात सर्वाधिक प्रकरणे आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे व सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेशात नोंदली जात आहेत. मागील पाच वर्षांत ही संख्या दीडपट झाली आहे.राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये देशात महिलांविषयक ३.३९ लाख गुन्हे नोंद झाली. २०१८ पर्यंत त्यांची संख्या वाढून तब्बल ३.७८ लाख झाली.उत्तर प्रदेशात १४ टक्के प्रकरणेमागील पाच वर्षांत देशात एकूण १७.४५ लाख प्रकरणांपैकी सर्वाधिक २.४० लाख (१४ टक्के) उत्तर प्रदेशातील आहेत. २०१४ मध्ये ३८,९१८, तर २०१८ मध्ये दीडपट म्हणजेच ५९,४४५ गुन्हे दाखल झाले. या काळात पश्चिम बंगालमध्ये १.६५ लाख व महाराष्टÑात १.५६ लाख प्रकरणे दाखल झाली आहेत.१४.५० प्रकरणांत न्यायाची प्रतीक्षा गृहमंत्रालयानुसार, महिलांबाबतच्या गुन्ह्यातील १४.५० लाख प्रलंबित प्रकरणांपैकी २० टक्क्यांहून अधिक २.५६ लाख प्रकरणे एकट्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. यानंतर १.९२ लाख प्रकरणे महाराष्ट्रात व १.६४ लाख प्रकरणे उत्तर प्रदेशातील आहेत.केवळ २३ टक्के प्रकरणांत शिक्षाअशा केवळ २३ टक्केच प्रकरणांत शिक्षा झाली आहे. यातील उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ६० टक्के प्रकरणांत शिक्षा देण्यात आली. प. बंगालमध्ये ही संख्या ५.२ टक्के, तर महाराष्ट्रात १३.२ टक्के आहे.न्याय मिळण्यात अडचणतपासातील दिरंगाईमुळे न्याय मिळण्यास अडचण येत आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. जलदगती न्यायालयांची कमी संख्या, तपास यंत्रणांनी वेळेवर कारवाई न करणे, एफएसएल अहवालात उशीर, यासाठी कारणीभूत आहे.प्रमुख राज्यांमधील महिलांविषयक गुन्हे2014-2018उत्तर प्रदेश 2,39,544प. बंगाल 1,65,641महाराष्ट्र 1,56,898राजस्थान 1,40,721मध्यप्रदेश 1,38,321बिहार 74,328गुजरात 43,625अखिल भारतीय 17,45,780महिलांविषयक प्रलंबित प्रकरणे2018उत्तर प्रदेश 1,64,720प. बंगाल 2,56,459महाराष्ट्र 1,92,200राजस्थान 75,882मध्यप्रदेश 85,063बिहार 74,099गुजरात 81,138अखिल भारतीय 14,49,773निर्भया फंडमहिलांविषयक गुन्हे वाढल्याचे संसदेत सांगण्यात आले. तथापि, गृहमंत्र्यांनी पोलीस, न्यायव्यवस्थेच्या प्रकरणात राज्यांच्या कोर्टात चेंडू टाकत ही राज्यांची जबाबदारी म्हटले आहे. तथापि, महिलांविषयक गुन्हे रोखण्यासाठी लॅप्स न होणाºया निर्भया फंडाची माहिती दिली. याअंतर्गत २०१९-२० मध्ये राज्यांना ४,३५७.६२ कोटी रुपये व त्यापूर्वीच्या पाच वर्षांत २,३५७.६२ कोटी रुपये दिल्याची माहिती दिली.