शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

वर्षभरात मारले १३८ पाक सैनिक; भारताचे चोख प्रत्युत्तर, चकमकीत २८ भारतीय जवानांना वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:21 IST

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत आणि जबाबी हल्ल्यांमध्ये सन २०१७ मध्ये पाकिस्तानचे १३८ सैनिक मारले गेले व १५५ जखमी झाले. गुप्तवार्ता संस्थांच्या सूत्रांनी ही माहिती देताना सांगितले की, याच काळात काश्मिरमध्ये २८ भारतीय जवानांना वीरमरण आले तर ७० जवान जखमी झाले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत आणि जबाबी हल्ल्यांमध्ये सन २०१७ मध्ये पाकिस्तानचे १३८ सैनिक मारले गेले व १५५ जखमी झाले. गुप्तवार्ता संस्थांच्या सूत्रांनी ही माहिती देताना सांगितले की, याच काळात काश्मिरमध्ये २८ भारतीय जवानांना वीरमरण आले तर ७० जवान जखमी झाले. सूत्रांनुसार गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानकडून केले जाणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन व सीमेपलिकडून केला जाणारा गोळीबार याला लगेचच्या लगेच आणि जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे खंबीर धोरण अवलंबिले.गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये भारतास सोसाव्या लागलेल्या मनुष्यहानीच्या आकड्यास लष्कराने दुजोरा दिला. परंतु पाकिस्तानचे नेमके किती सैनिक मारले गेले वा जखमी झाले याचा आकडा दिला नाही. मात्र पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या प्रत्येक उल्लंघनाचे चोख प्रत्युत्तर दिले गेले, यावर लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी भर दिला.सीमेवरील हिंसक घडामोडींमध्ये मारल्या जाणाºया लष्करी जवानांच्या नेमक्या आकड्याची कबुली पाकिस्तान सहसा देत नाही. अनेक वेळा मृतांचा आकडा कबुल केला जातो, पण ते लष्करी जवान नव्हे तर नागरिक होते, असा दावा केला जातो. त्यामुळे अशा आकडेवारीसाठी गुप्तवार्ता सूत्रांवर अवलंबून राहावे लागते. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ष २०१७ मध्ये पाकिस्तानने काश्मिरमध्ये ८६० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याआधीच्या वर्षी २२० अशा घटना घडल्या होत्या, म्हणजेच सरत्या वर्षात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना खूपच वाढल्या.गेल्या वर्षभरात चीननेकेली ४१५ वेळा घुसखोरीगेल्या वर्षी डोकलामवरून भारत व चीन यांच्यात ७३ दिवस झालेला तणाव सर्वांना माहीत आहे. पण २0१७ मध्ये चीनने तब्बल ४१५ वेळा भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. चीनच्या सैनिकांनी २0१६मध्ये २७१ वेळा नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न केले होते.नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये २३ वेळा गंभीर वादाचे प्रसंग घडले. लडाख, केडेमचौक, चुमार, पेंगोंग, स्पांगूर गॅप, हिमाचल प्रदेशमधील कौरिक, उत्तराखंडमधील बाराहोती, अरूणाचल प्रदेशातील नमका चू, सुमदोरोंग चू, असफिला व दिबांग घाट आदी भागांत या घटना घडल्याचे सैन्य दलाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान