ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 11 - 130 रुपयांसाठी एका वेटरची हत्या केल्याची धक्कादाक घटना हैदराबाद मध्ये घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव राजू असे आहे. तो मूळचा महाराष्ट्राचा असून तीन दिवसांपूर्वी कामावर रुजू झाला होता. हैदराबादमधील कांचनबाग येथील स्पाईस बावर्ची रेस्टॉरंटमध्ये तो काम करत होता. याच हॉटेलमध्ये काम करत असलेल्या स्वयंपाकी कमलेश याच्याशी टीपवरुन झालेल्या भांडणात त्याचा मृत्यू झाला आहे. 10 दिवसांपूर्वी कमलेश स्वंयपाकी म्हणून कामाला लागला होता. तो मुळचा उत्तरप्रदेशचा आहे. राजू आपलं काम संपल्यावर परिसरातील बागेत किंवा रेल्वे स्टेशनवर झोपायचा. तर कमल हा हॉटेलमध्येच झोपायचा. हॉटेलमध्ये काम संपल्यावर दिवसभरात मिळालेल्या टीपचे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समान वाटप व्हायचे. राजूने टीपमधील 130 रुपये चोरल्याचा कमलला संशय होता. काल सकाळी राजू कामासाठी हॉटेलमध्ये येत असताना कमलने त्याला हॉटेलबाहेरच अडवले. 130 रुपये दिल्याशिवाय आत जाऊ देणार नाही अशी धमकीही त्याने राजूला दिली. यावरुन राजू आणि कमलमध्ये कडाक्याचे भांडण झाले. नंतर दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. यादरम्यान कमलने राजूला जोरात धक्का दिला. यात राजूला खाली पडला. अंतर्गत दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला. यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हॉटेल मालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी कमलला ताब्यात घेतले आहे.
130 रुपयांसाठी केली वेटरची हत्या
By admin | Updated: April 11, 2017 16:57 IST