१३... मालेवाडा... वन
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
(फोटो)
१३... मालेवाडा... वन
(फोटो)वनरक्षकांच्या निवासस्थानांची दैनावस्थाबोटेझरी वनपरिक्षेत्र : वन विभागाचे दुर्लक्षमालेवाडा : भिवापूर तालुक्यातील बोटेझरी वनपरिक्षेत्रात बोटेझरी, मालेवाडा व सालेभट्टी येथे वनरक्षकांसाठी निवासस्थानांचे फार पूर्वी बांधकाम करण्यात आले होते. कित्येक वर्षांपासून देखभाल व दुरुस्ती करण्यात न आल्याने त्या निवासस्थानांची दैनावस्था झाली आहे. बोटेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत भिवापूर तालुक्यातील बोटेझरी, मालेवाडा, सुकळी, सालेभट्टी या परिसरातील जंगलांचा समावेश करण्यात आला आहे. या जंगलांच्या देखभाल व संरक्षणासाठी या ठिकाणी काही वनरक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. ग्रामीण भागात वनरक्षकांना राहण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने त्यांच्या मुख्यालयी निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याचा प्रश्न त्यावेळी सुटला होता. ही सर्व निवासस्थाने कौलारू आहेत. या निवासस्थानांची कित्येक वर्षांपासून वन विभागाने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे निवासस्थानांवरील कवेलू फुटले असून, ते बदलविण्यात आले नाही. बहुतांश भिंतीना मोठमोठ्या तडा गेल्या असून, काही निवासस्थानांच्या भिंती कोसळल्या आहेत. पावसाळ्यात ही निवासस्थाने मोठ्या प्रमाणात गळत असून, ती आता राहण्यायोग्य राहिलेली नाहीत.हल्ली या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, उपद्रव आणि वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनरक्षकांना रात्री-बेरात्री मुख्यालय गाठावे लागते. रात्र काढण्यासाठी योग्य निवासस्थान नसल्याने वनरक्षकांनाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वन विभागाने या निवासस्थानांची वेळीच दुरुस्ती करावी, अशी मागणी वन कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)***