धर्मगुरुंच्या उपस्थितीत १३ सामूहिक विवाह
By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST
जळगाव : दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरु डॉ.सैयदना आलीकदार मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री १३ सामूहिक विवाह (निकाह) पार पडले. तसेच १० जणांना समाजाच्या दोन पदव्या प्रदान करण्यात आल्या.
धर्मगुरुंच्या उपस्थितीत १३ सामूहिक विवाह
जळगाव : दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरु डॉ.सैयदना आलीकदार मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री १३ सामूहिक विवाह (निकाह) पार पडले. तसेच १० जणांना समाजाच्या दोन पदव्या प्रदान करण्यात आल्या. धर्मगुरुंचे सोमवारी जळगावात आगमन झाले होते. त्यांच्या उपस्थितीत शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहे. गुरुवारी त्यांनी धरणगाव येथे भेट दिली. त्यानंतर संध्याकाळी जळगावातील शिवाजीनगर मशिदीमध्ये त्यांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर १३ सामूहिक विवाह (निकाह) लावण्यात आले. तसेच १० जणांना हादियात आणि मफ्सियत या दोन पदवी प्रदान करण्यात आल्या. या वेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.