रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या 13
By admin | Published: October 2, 2014 12:54 AM2014-10-02T00:54:41+5:302014-10-02T00:54:41+5:30
मडुआडीहकडून लखनौकडे जाणा:या कृषक एक्स्प्रेस व लखनौहून येणा:या बरौनी एक्स्प्रेसच्या झालेल्या अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची संख्या 13 वर पोहोचली
Next
गोरखपूर : मडुआडीहकडून लखनौकडे जाणा:या कृषक एक्स्प्रेस व लखनौहून येणा:या बरौनी एक्स्प्रेसच्या झालेल्या अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची संख्या 13 वर पोहोचली असून यात 47 प्रवासी जखमी झाले आहेत. नंदनगर रेल्वेस्थानकापासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर लूप लाईनवरून वळण घेत असलेल्या बरौनी एक्स्प्रेसला वेगाने धावत असलेल्या कृषक एक्स्प्रेसने मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास धडक दिली होती.
मंगळवारी रात्री 1क् वाजून 47 मिनिटांनी नंदनगर रेल्वे क्रॉसिंगजवळच्या लूप लाईनच्या वळणावरून जाणा:या बरौनी एक्स्प्रेसला समोरून येणा:या कृषक एक्स्प्रेसने जोरात धडक दिली. या धडकेने बरौनी एक्स्प्रेसचे मागील तीन डबे रुळावरून घसरले. प्रथमदर्शनी कृषक एक्स्प्रेसने थांबायला हवे होते मात्र सिग्नलकडे दुर्लक्ष करून गाडी पुढे नेल्याबद्दल कृषक एक्स्प्रेसचे लोको पायलट राम बहादूर व सहायक लोको पायलट सत्यजित यांना निलंबित करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात सापडलेल्यांबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या. अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून दोन-दोन लाख रुपये, तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांना 5क्-5क् हजार रुपये दिले जाणार आहेत.
या अपघाताच्या एका प्रत्यक्षदर्शीनुसार, एक जोरात धक्का बसला आणि आम्ही पाहिले की रेल्वेचा एक डबा खाली कोसळला होता. माङो काका त्याच्याखाली आल्याचे तसेच अनेकांचे हातपाय तुटल्याचे मी माङया डोळ्यांनी पाहिले. या अपघातामुळे अवरुद्ध झालेला मार्ग बुधवारी दुपारनंतर मोकळा करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
4गोरखपूर येथे झालेल्या अपघाताबाबत शोक व्यक्त करतानाच रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे.
4अपघातग्रस्त स्थळाची पाहणी केल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. ज्या दोन रेल्वेगाडय़ांची टक्कर झाली त्यांच्या इंजिनांच्या लोको पायलटांना निलंबित केले गेल्याची माहिती गौडा यांनी दिली.