शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार सरकारी वेबसाइट्स धोक्यात; केंद्राचा इशारा, हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशियाने जाहीर केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 09:32 IST

भारतातील केंद्र व राज्य सरकारांच्या १२ हजार वेबसाइटस्ची यादी हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या गटाने जारी केली आहे.

नवी दिल्ली :

भारतातील केंद्र व राज्य सरकारांच्या १२ हजार वेबसाइटस्ची यादी हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या गटाने जारी केली आहे. या वेबसाइटवर त्या गटाकडून नजीकच्या काळात सायबर हल्ला होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारांची विविध खाती, तसेच अन्य यंत्रणांना अतिशय सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गृह खात्याने दिला आहे. 

सायबर हल्ले चढविणाऱ्या प्रवृत्ती देश किंवा विदेशातून सक्रिय असू शकतात. भारत व अन्य देशांतील वेबसाइट हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया या गटाने याआधी हॅक केल्या आहेत. त्या गटाने भारतातील १२ हजार वेबसाइटची यादी जारी केल्याची माहिती सर्वांत प्रथम केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने केंद्र सरकारला दिली. विविध राज्य सरकारांच्या वेबसाइटवर हल्ले होण्याचा मोठा धोका असल्याचेही या टीमने कळविले. त्यानंतर सर्व राज्यांना याची तातडीने माहिती देण्यात आली.कोण आहे हॅक्टिव्हिस्ट?- हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया असे नाव असले तरी हा गट इंडोनेशियातीलच आहे असे खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. - सायबर हल्ले करणारा हा गट मलेशिया किंवा अन्य इस्लामी देशांतूनही कारवाया करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशा हल्ल्यांचे काही प्रयत्नही झाले होते; पण आता त्या गटाने भारतातील सरकारी वेबसाइटची यादीच जाहीर केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.- या गटाकडून चीन, तसेच युक्रेनच्या वेबसाइटवरही हल्ला होऊ शकतो असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले. - हॅक्टिव्हिस्ट इंडोनेशिया भारतातील सरकारी व अन्य वेबसाइटवर सायबर हल्ला करण्याची अशी शक्यता गेल्या वर्षापासून वर्तविण्यात येत होती. 

गुजरातच्या वेबसाइटवर गेल्या वर्षी हल्लेया गटाने गेल्या वर्षी गुजरात सरकारच्या वेबसाइटवर हल्ले केले होते. वेबसाइटचे कामकाज स्लोडाउन व्हावे, देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ कोणालाही घेता येऊ नये, असे प्रयत्न गटाने केले होते. डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस प्रणालीचा वापर करून सायबर हल्लेखोर सरकार किंवा खासगी वेबसाइटवर आपले नियंत्रण प्रस्थापित करतात. असा काही प्रकार घडल्यास त्याची माहिती सरकारी यंत्रणा cybercrime.gov.in या वेबसाइटवर त्वरित देऊ शकतात असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम