शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

१२... खापरखेडा... रोड

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

(फोटो)

(फोटो)
रस्त्यांच्या बांधकामात घोळ
चौकशी अहवालात उघड : दलित वस्ती सुधार योजना निधीचा गैरवापर
अरुण महाजन ० खापरखेडा
खापरखेडा नजीकच्या सिल्लेवाडा ग्रामपंचायतला जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधार योजनेचा ३० लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला होता. या निधीचा वापर दलित बांधवांच्या वस्त्यांमधील विकास कामांसाठी करावयाचा होता. वास्तवात तो निधी इतरत्र वापरण्यात आला. शिवाय, प्राकलनात मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांची मोजमापाची नोंद अधिक लांबीची दाखविण्यात आली. प्रत्यक्षात निर्मिती कमी लांबीची करण्यात आली. मोजमापाच्या नोंदीनुसार बिलांची उचलही करण्यात आली. हा प्रकार चौकशी अहवालात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.
सिल्लेवाडा ग्रामपंचायतला २०१३-१४ मध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून दलित बांधवांच्या वस्त्यांमधील सिमेंट रस्त्यांची बांधकामे करावयाची होती. यात सिल्लेवाडा येथील वॉर्ड क्रमांक - १ मध्ये १४९.६३ मीटर रस्ता मंजूर करण्यात आला. मात्र, हा रस्ता १३५ मीटर लांबीचा तयार करण्यात आला असून, १९५ मीटर लांब रस्त्याचे मोजमाप नोंदविण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक - २ मध्ये १४९.६३ मीटर रस्ता मंजूर करण्यात आला असून, प्रत्यक्षात १४४.५० मीटर रस्त्याचे काम करण्यात आले. या वॉर्डात १९५ मीटर रस्त्याचे मोजमाप नोंदविले आहे. वॉर्ड - ३ मध्ये १४९.६३ माीटर रस्ता मंजूर केला. या ठिकाणी १८० मीटर रस्त्याचे मोजमाप नोंदविण्यात आले. प्रत्यक्षात १४५ मीटर रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आले. वॉर्ड क्रमांक - ४ मध्ये १४९.६३ मीटर लांबीच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली. काम मात्र १६५ मीटर रत्याचे करण्यात आले. मोजमाप करताना हा रस्ता १८९ मीटर नोंदविण्यात आला. वॉर्ड क्रमांक - ५ मध्ये १४९.६३ मीटर लांबीचा रस्ता मंजूर करण्यात आला असून, या रस्त्याचे मोजमाप १८५.६० मीटर दाखविण्यात आले. वास्तवात हा रस्ता १८० मीटर तयार करण्यात आला.
या सर्व रस्त्यांची जाडी ही ०.१७ मीटर (अंदाजपत्रकानुसार) असायला हवी होती. ही जाडी ०.१५ मीटर एवढी ठेवण्यात आली. सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मुरुम टाकणे आवश्यक असताना, काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला मुरुम टाकण्यात आला नाही, असेही प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले.