हैदराबाद : शहराच्या बाहेरील किसरागुट्टा भागात उत्खननादरम्यान जैन तीर्थंकरांच्या चौथ्या आणि पाचव्या शतकातील १२ मूर्ती सापडल्या आहेत.तेलंगणच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक बी. श्रीनिवास यांनी येथे पत्रकारांना यासंदर्भात सांगितले की, शनिवारी दोन मंदिरांमध्ये रस्ता निर्मिती सुरू असताना पायऱ्यांजवळ एक फूट खोलात जैन तीर्थंकरांच्या पंचधातूच्या १२ मूर्ती आढळल्या. (वृत्तसंस्था)
जैन तीर्थंकरांच्या १२ मूर्ती सापडल्या
By admin | Updated: October 22, 2014 05:44 IST