१२... करवाही... बावनथडी... जोड...०१
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
यावेळी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व वास्तवतेकडे डोळेझाक करीत बळाचा वापर केला आणि पुसद्यातील प्रकल्पग्रस्तांना जनावरांप्रमाणे वागणूक देत फरफटत घराबाहेर काढले. ही कारवाई ऐन पावसाळ्यात करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांनी हार न मानता २०१२ चा अख्खा पावसाळा उघड्यावर व अर्धपोटी काढला. हा सर्व प्रकार सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांना चांगल्या तऱ्हेने माहिती होता. मात्र, एकही नेता या प्रकल्पग्रस्तांचा कैवारी म्हणून पुढे आला नाही. मग, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणे, त्या सभागृहात लावून धरणे या बाबी दूरच राहिल्या. शिवाय, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या प्रकल्पग्रस्तांच्या अवस्थेचे कधीच वास्तपुस्त करण्याचे औदार्य दाखविले नाही. आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेवर येथील प्रकल्पग्र्रस्त आजही आहे त्या परिस्थितीत जीवन व्यथीत करीत आहे.
१२... करवाही... बावनथडी... जोड...०१
यावेळी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व वास्तवतेकडे डोळेझाक करीत बळाचा वापर केला आणि पुसद्यातील प्रकल्पग्रस्तांना जनावरांप्रमाणे वागणूक देत फरफटत घराबाहेर काढले. ही कारवाई ऐन पावसाळ्यात करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांनी हार न मानता २०१२ चा अख्खा पावसाळा उघड्यावर व अर्धपोटी काढला. हा सर्व प्रकार सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांना चांगल्या तऱ्हेने माहिती होता. मात्र, एकही नेता या प्रकल्पग्रस्तांचा कैवारी म्हणून पुढे आला नाही. मग, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणे, त्या सभागृहात लावून धरणे या बाबी दूरच राहिल्या. शिवाय, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या प्रकल्पग्रस्तांच्या अवस्थेचे कधीच वास्तपुस्त करण्याचे औदार्य दाखविले नाही. आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेवर येथील प्रकल्पग्र्रस्त आजही आहे त्या परिस्थितीत जीवन व्यथीत करीत आहे.या सहाही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. नाईलाजाने का होईना प्रकल्पग्रस्तांनी या पुनर्वसितस्थळ नव्याने संसार थाटला. या पुनर्वसित स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथे शासनाच्या पुनर्वसन नियमाप्रमाणे कोणत्याही सुविधा पुरविण्यात आल्या नाही, असे स्पष्ट दिसून येते. दुसरीकडे या पुनर्वसितस्थळी प्रकल्पग्रस्तांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा पुरविण्यात आल्याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी कागदोपत्री करून अहवाल शासनाकडे सादर केला. ---------------चौकट-----------दहनशेड घरालगतकोणत्याही गावातील स्मशानभूमी ही गावाहेर असते. पिंडकापारचे पुनर्वसन करतेवेळी तेथील स्मशानभूमीची निर्मिती ही गावालगत करण्यात आली. शिवाय, त्यात स्मशानभूमी दहनशेडचीही निर्मिती करण्यात आली. सदर दहनशेड गावालगत म्हटल्यापेक्षा घरालगत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे तेथील नागरिक या स्मशानभूमीचा कधीच वापर करीत नाही. या स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सुविधाही निर्माण करण्यात आली नाही. परिणामी, पिंडकापार येथील नागरिक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाबाहेर नेतात. --------------------------चौकट---------रेशनचे दुकान आहे तरी कुठेप्रकल्पग्रस्तांपैकी काहींकडे शिधापत्रिका आहे. परंतुु, या शिधापत्रिकांचा त्यांना काहीही उपयोग होताना दिसून येत नाही. बहुतांश प्रकल्पग्रस्त हे दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांना शासनाकडून वाटप करण्यात येणारे कमी किमतीचे धान्यही मिळत नाही. कारण, या गावातील रेशनचे दुकान नेमके कुठे आहे, हेच या गावातील नागरिकांना माहिती नाही.