शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

लष्कराकडून 114 दहशतवाद्यांचा खात्मा, अबू दुजाना ठरला 115वा टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 12:03 IST

सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत

ठळक मुद्दे31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेतअबु दुजाना आणि आरिफ लिहारीचा क्रमांक अनुक्रमे 115 आणि 116 वा होता2 जुलैपर्यंत एकूण 92 दहशतवादी ठार होते, 31 जुलैपर्यंत हा आकडा 114 वर पोहोचला.

नवी दिल्ली, दि. 2 - लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबु दुजाना आणि आरिफ लिहारी यांचा मंगळवारी सुरक्षा जवानांनी खात्मा केला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 114 दहशतादी ठार झाले असून अबु दुजाना आणि आरिफ लिहारीचा क्रमांक अनुक्रमे 115 आणि 116 वा होता. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गतवर्षी 31 जुलैपर्यंत हा आकडा 92 होता. म्हणजेच यावर्षी 114 दहशतवादी ठार झाले असताना, 2016 मध्ये 92 दहशतवादी ठार झाले होते.

विशेष म्हणजे फक्त जुलै महिन्यात जवळपास 22 दहशतवादी ठार झाले आहेत. 2 जुलैपर्यंत एकूण 92 दहशतवादी ठार होते, 31 जुलैपर्यंत हा आकडा 114 वर पोहोचला.

2012 आणि 2013 मधील आकडेवारी पाहता 2017 मधील आकडा खूपच वाढला आहे. 2012 आणि 2013 मध्ये अनुक्रमे 72 आणि 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं. एनडीए सत्तेत आल्यानंतर आकडेवारीमध्ये सतत वाढ होत असल्याचं दिसत आहे. 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108 आणि 2016 मध्ये 150 दहशतवादी ठार झाले होते. 'दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मोकळे हात दिले असून तसंच राजकीय पाठिंबा मिळत असल्याने सुरक्षा जवानांना गतवर्षी असलेला 150 चा आकडा पार करण्यात यश मिळेल', असं गृहमंत्रालयाशी संबंधित एका अधिका-याने सांगितलं आहे. 

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबु दुजाना आणि त्याच्या साथीदाराचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर सुरक्षा जवानांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. सुरक्षा जवानांना गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात चांगलं यश मिळत आहे. सुरक्षा तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व सरकारच्या नव्या रणनीतीचा परिणाम आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. 

गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार काश्मीरसंबंधी मुख्य तीन गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, ज्यामध्ये जर का दहशतवादी आत्मसमर्पण करण्यास नकार देत असेल तर त्यांना ठार करण्यात येत आहे. चकमक होत असलेल्या ठिकाणी स्थानिकांकडून निदर्शन होत असलं तरी त्याचा काहीच प्रभाव सुरक्षा जवानांवर होत नाही. सोबतच टेरर फंडिंगशी संबंधित हुर्रियत फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, स्थानिक लोकांसोबत शक्य तितकी नरमाईची भूमिका घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल ज्यामुळे त्यांना आपण पीडित असल्याचं भासू नये. येणा-या दिवसांमध्ये सुरक्षा जवान आपली ही भूमिका कायम ठेवतील असं एका अधिका-याने सांगितलं आहे. 

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे दहशतवाद्यांवरील दबाव अजून वाढेल. याशिवाय अन्य मोठे दहशतवादी ज्यामध्ये अबू इस्माईल आणि हिजबूल, अलकायदाशी संबंधित झाकीर मूसा यांचा समावेश आहे, त्यांना ठार करण्यासाठी लष्कराकडे प्लान तयार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्थानिक सुत्रांकडून मिळणारी माहिती आणि सुरक्षा जवानांमध्ये होणारा योग्य सुसंवाद यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्यात यश मिळेल असा विश्वास सरकारला आहे.