जिल्ात ११५ पाणीपुुरवठा योजना
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
जिल्हा परिषद : टंचाई दूर होण्याला मदत
जिल्ात ११५ पाणीपुुरवठा योजना
जिल्हा परिषद : टंचाई दूर होण्याला मदतनागपूर -ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा कृ ती आखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल २०१५ पर्यंत जिल्ह्यातील ११५ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण केली जाणार आहे.केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत हा कार्यक्र म राबविला जात आहे. हा मागणी आधारित कार्यक्रम आहे. ज्या गावात पाणीटंचाई आहे, तसेच जी ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल करून देखभाल व दुरुस्तीसाठी सक्षम आहे, अशाच गावांची प्राधान्याने या योजनेसाठी निवड केली जाते.२०१२-१३ या वर्षात १०१ तर २०१३-१४ या वर्षात ८५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. वित्त वर्षात ११५ योजनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील ४७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ६१ योजना प्रगतीपथावर आहे. ७ योजनांची कामे तांत्रिक वा अन्य कारणामुळे रखडलेली आहेत. यातील चार योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आहेत. निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना या योजनेसाठी शासनाकडून तीन टप्प्यात निधी दिला जाणार आहे.(प्रतिनिधी)चौकटबाधित गावांना प्राधान्य या योजनेसाठी निधी उपलब्ध आहे. गुणवत्ता बाधित गावांना प्राधान्य देऊ न शुध्द पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. एप्रिल २०१५ पर्यत उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांनी दिली.