शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ८२२ दंगलींत १११ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:13 IST

देशामध्ये २०१७ साली ८२२ जातीय दंगलींमध्ये १११ जण ठार व २३८४ जण जखमी झाल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. सर्वाधिक दंगली उत्तर प्रदेशात झाल्या आणि मृतांची संख्याही त्याच राज्यात अधिक आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये २०१७ साली ८२२ जातीय दंगलींमध्ये १११ जण ठार व २३८४ जण जखमी झाल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. सर्वाधिक दंगली उत्तर प्रदेशात झाल्या आणि मृतांची संख्याही त्याच राज्यात अधिक आहे.अहीर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त जातीय दंगली झाल्या. या राज्यात १९५ दंगलींमध्ये ४४ जण ठार व ५४२ जण जखमी झाले. कर्नाटकमध्ये १०० जातीय दंगली झाल्या. त्यात नऊ लोक ठार व २२९ जण जखमी झाले. राजस्थानमध्ये ९१ जातीय दंगलींमध्ये १२ जण ठार व १७५ जण जखमी झाले. बिहारमध्ये गेल्या वर्षी ८५ जातीय दंगलींमध्ये तीन जण ठार व ३२१ जण जखमी झाले. त्याखालोखाल मध्य प्रदेशमध्ये अशा ६० दंगलींमध्ये नऊ जण ठार व १९१ जण जखमी झाले. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ५८ जातीय दंगलींमध्ये नऊ जण ठार व २३० जण जखमी झाले. गुजरातमध्ये गेल्या वर्षी ५० जातीय दंगलींमध्ये आठ जण ठार व १२५ जण जखमी झाले.>जातीय दंगलींत झाली वाढहंसराज अहीर म्हणाले की, २०१५ साली ७५१ जातीय दंगलींमध्ये ९७ जण ठार व २२६४ जण जखमी झाले होते.२०१६ साली देशामध्ये ७०३ जातीय दंगलींमध्ये ८६ जण ठार व २३२१ जण जखमी झाले होते.२०१५ व २०१६ या दोन वर्षांपेक्षा २०१७ साली देशात जातीय दंगलींचे प्रमाण वाढलेले आहे.