शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्यांना दिल्लीत ११०० फ्लॅट?; केंद्रीय गृह मंत्रालय-शहरी विकास मंत्रालय आले आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 07:30 IST

दिल्लीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे फ्लॅट बनविण्यात आले आहेत. 

- शरद गुप्तानवी दिल्ली : म्यानमारहून आलेल्या रोहिंग्या निर्वासितांना दिल्लीतील ११०० फ्लॅट वाटप करण्याच्या निर्णयावरून बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालय आणि शहरी विकास मंत्रालय आमने-सामने आले. दिल्लीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे फ्लॅट बनविण्यात आले आहेत. 

शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी घोषणा केली की, दिल्लीतील बक्करवालामधील फ्लॅट रोहिंग्या निर्वासितांना देण्यात येतील. निर्वासितांचे स्वागत करण्याच्या भारताच्या परंपरेला अनुसरूनच हे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, १९५१ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांबाबतच्या संकल्पाचा भारत आदर करतो. मात्र, काही वेळातच विहिंप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या निर्णयावर टीका केली. 

विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १० डिसेंबर २०२० रोजी संसदेत केलेल्या वक्तव्याची आठवण हरदीपसिंग पुरी यांना करून दिली. यात ते म्हणाले होते की, रोहिंग्यांना भारत कधीही स्वीकारणार नाही. कारण ते निर्वासित नाहीत तर, घुसखोर आहेत.  दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली रोहिंग्यांच्या मुद्द्यावर रविवारी एक बैठक झाली. या बैठकीस दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांसह केंद्रीय गृह मंत्रालय आणि शहरी विकास मंत्रालयाचे अधिकारी यांनी भाग घेतला होता.

यावेळी मदनपूर खादर येथे तंबूत राहत असलेल्या रोहिंग्यांच्या सुरक्षेवर काळजी व्यक्त करण्यात आली. शहरी विकासकडून असा प्रस्ताव देण्यात आला की, रोहिंग्यांना निवासस्थाने देण्यात यावीत. अर्थात, बैठकीत असा कोणताच निर्णय झाला नाही. पण, मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी सकाळी रोहिंग्यांना निर्वासित असल्याचे सांगत निवासस्थाने वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली आणि येथूनच चर्चेला सुरुवात झाली.

टॅग्स :delhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार