शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादेत इसिसचे ११ संशयित ताब्यात

By admin | Updated: June 30, 2016 05:32 IST

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जुन्या हैदराबादेत बुधवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या ११ संशयितांना ताब्यात घेतले आहे

हैदराबाद : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जुन्या हैदराबादेत बुधवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या ११ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात संघटनेचे ‘टेरर मॉडेल’ उद्ध्वस्त केल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे.  एनआयएने विविध भागांतून ताब्यात घेतलेल्या या ११ तरुणांत एक जण आयटीशी संबंधित व  काही पदवीधारकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अधिकाऱ्यांनी हत्यारे, दारूगोळा, युरिया,  अ‍ॅसिड, काही रसायने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. याशिवाय या तरुणांकडून १५ लाख रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. हे तरुण इसिसच्या म्होरक्यांच्या इशाऱ्यावरून काम करीत असल्याचा दावाही एनआयए आणि हैदराबाद पोलिसांनी केला आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या संशयितांनी शहरात अतिरेकी कारवाया करण्याची एक योजना बनविली होती. त्यांच्याकडून १५ लाख रुपये आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, हैदराबादेतील पोलीस सूत्रांनी सांगितले की, विश्वसनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हैदराबादेतील तरुण व त्यांच्या साथीदारांनी देशाविरुद्ध गुन्हेगारी कट आखला होता. त्यासाठी त्यांनी हत्यारे आणि स्फोटके एकत्र केली होती. या पार्श्वभूमीवर सकाळपासून दहा ठिकाणी शोध घेत धाडी टाकण्यात आल्या. (वृत्तसंस्था)>तेलंगण सरकारवर टीकाभाजपने या प्रकरणात आज तेलंगणा सरकारवर टीका केली. शहरात अतिरेकी प्रवृत्ती वाढत आहेत. सरकारच्या दुर्लक्षामुळे हे घडत असल्याचा आरोपही भाजपचे राज्य प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी केला आहे.