शेवगाव तालुक्यात ११ नवे गावकारभारी
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
शेवगाव : तालुक्यातील अत्यंत राजकीय प्रतिष्ठेच्या झालेल्या गदेवाडीच्या सरपंचपदी शिवसंग्रामच्या लक्ष्मीबाई हरिचंद्र इसारवाडे तर उपसरपंचपदी टायगर फोर्सच्या उषा सुरेश धनवडे यांची बहुमताने निवड झाली. बाळासाहेब काकडे हे सदस्य गैरहजर राहिले होते तर तालुक्यात बहुतेक ठिकाणी महिलाराज निर्माण झाले आहे.
शेवगाव तालुक्यात ११ नवे गावकारभारी
शेवगाव : तालुक्यातील अत्यंत राजकीय प्रतिष्ठेच्या झालेल्या गदेवाडीच्या सरपंचपदी शिवसंग्रामच्या लक्ष्मीबाई हरिचंद्र इसारवाडे तर उपसरपंचपदी टायगर फोर्सच्या उषा सुरेश धनवडे यांची बहुमताने निवड झाली. बाळासाहेब काकडे हे सदस्य गैरहजर राहिले होते तर तालुक्यात बहुतेक ठिकाणी महिलाराज निर्माण झाले आहे.तालुक्यातील गदेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागेसाठी तीन मंडळ रिंगणात उतरले होते. त्यामध्ये भाजपा-शिवसंग्राम मंडळास ५ जागा, राष्ट्रवादीच्या मंडळास २ तर भारतीय टायगर फोर्स यांना २ जागा मिळाल्या होत्या परंतु सरपंचपदासाठी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे व टायगर फोर्स एकत्र येऊन सरपंचपदी शिवसंग्रामच्या लक्ष्मीबाई इसारवाडे यांना ५ तर सुनीता श्रीराम घोडके यांना ३ मते मिळाली तसेच उपसरपंच उषा सुरेश धनवडे यांना ५ तर भीमराज मिसाळ यांना तीन मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय घुले यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक राणी झिरपे यांनी मदत केली. निवड जाहीर होताच संजय नाचण, नवनाथ इसारवाडे, नानासाहेब मडके, रमेश धनवडे, नवनाथ धनवडे, नितीन कुसाळकर, संभाजी कराळे आदी समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. ठाकूर निमगाव येथे सरपंचपदी बाजार समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ कातकडे तर उपसरपंचपदी नारायण निजवे यांची बिनविरोध निवड झाली. येथे राष्ट्रवादीचे नेते व बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ कातकडे यांनी सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकून वर्चस्व मिळविले होते. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. कोनोशी येथे सरपंचपदासाठी निवडणूक होऊन राष्ट्रवादीच्या मंगल बडे विजयी झाल्या तर उपसरपंचपदी राजेंद्र दौंड यांची बिनविरोध निवड झाली तर नवीन दहिफळ येथे सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुनीता संजय शिंदे तर उपसरपंचपदी भाऊसाहेब बापू आर्ले यांची बिनविरोध निवड झाली. तळणी येथे राष्ट्रवादीचे रामहरी घुले, रामदास घुले, ज्ञानेश्वर निकम, संभाजी चौधर यांच्या मंडळाचे सरपंचपदी शिवाजी धोंडीबा घुले तर उपसरपंचपदी ज्ञानदेव श्रीपती शहाणे यांची निवड झाली. सोनेसांगवी येथे भाजपाचे सुरेश मडके, विठ्ठल मडके, सुधाकर मडके, सुधाकर आंधळे यांच्या मंडळाच्या सरपंचपदी सुमित्रा हरिभाऊ आंधळे तर उपसरपंचपदी मनिषा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.