शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

ममता बॅनर्जींचा शिरच्छेद करणाऱ्यास ११ लाख

By admin | Updated: April 13, 2017 01:18 IST

पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीदिनी भगवान श्रीराम यांचा जयघोष करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता

अलिगढ : पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीदिनी भगवान श्रीराम यांचा जयघोष करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भाजयुमोचे नेते योगेश वार्ष्णेय म्हणाले की, ‘‘बॅनर्जी यांचे सरकार लोकांना मारहाण करीत आहे. जर कोणाच्या अंगात लाल शर्ट किंवा लाल पँट असेल तर त्यांना पोलीस क्रूर मारहाण करतात. बॅनर्जी इफ्तार पार्टी आयोजित करतात. त्या मुस्लिमांच्या वतीने बोलतात. मला त्यांना हे विचारायचे आहे की हिंदू हे मानव नाहीत का?’’ त्यांच्यात जर कोणतीही माणुसकी शिल्लक असती तर त्यांनी अशा पद्धतीने मारहाण केली नसती. जर कोणी बॅनर्जी यांचे शिरच्छेद केलेले डोके मला आणून दिले तर मी त्याला ११ लाख रुपये देईन, असे वार्ष्णेय पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करताना म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सुरी (जिल्हा बीरभूम) येथे श्रीरामाचा जयजयकार करणाऱ्या मेळाव्याला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. पोलिसांनी मिरवणुकीसाठी लोखंडी पाईपने अडथळे निर्माण केले होते. मिरवणुकीतील काही जणांनी ते तोडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी लाठीमार केला. (वृत्तसंस्था)वार्ष्णेय यांना अटक कराकोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या हत्येसाठी भाजयुमो नेत्याकडून बक्षीस जाहीर करण्यात आल्याच्या घटनेचा तृणमूल काँग्रेसने बुधवारी निषेध केला. राजकारणातील गुंड प्रवृत्तीने बॅनर्जी यांना ही धमकी दिली आहे. धमकी देणारे योगेश वार्ष्णेय यांना तात्काळ अटक का झाली नाही, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे नेते व राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी विचारला आहे. संसदेतही निषेधनवी दिल्ली : भाजयुमोच्या नेत्याने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तीव्र शब्दांत धिक्कार केला.