शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पात्रतेसाठी ११ लाख शिक्षकांना आता अखेरची संधी - प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:01 IST

देशभरातील ११ लाख शिक्षकांना अद्यापही पात्रता मिळवता आलेली नाही. त्यांना पुढील दोन वर्षात ती मिळवण्याची अखेरची संधी दिली जाईल, असे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : देशभरातील ११ लाख शिक्षकांना अद्यापही पात्रता मिळवता आलेली नाही. त्यांना पुढील दोन वर्षात ती मिळवण्याची अखेरची संधी दिली जाईल, असे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी बदल, सशक्तीकरण आणि नेतृत्वासाठी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी उपराष्टÑपती एम. वेंकय्या नायडू यांनी ३१९ शिक्षकांना २०१६च्या राष्टÑीय पुरस्काराने सन्मानित केले. ‘दीक्षा’ या डिजिटल व्यासपीठाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला. या राष्टÑीय पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही देशभरातील एक कोटी शिक्षकांचा सन्मान करीत आहोत. कुणी चांगले काम करीत असेल. वर्षभर मन लावून मुलांना शिकवत असेल तर त्यांच्या कामाची प्रशंसा व्हायला हवी. शिक्षकांना प्रतिष्ठा मिळायला हवी. त्याचवेळी शिक्षकांनीही त्याला अनुरूप असे काम करायला हवे. ११ लाख शिक्षकांकडे अजूनही पात्रता नाही. दोन वर्षात त्यांना ही पात्रता मिळवण्याची अखेरची संधी देत आहोत. त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत त्यासाठी नोंदणी करावी लागेल. २०१९ पर्यंत ते उत्तीर्ण न झाल्यास त्यांना नोकरी गमवावी लागेल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश प्रेरणादायी आहे. त्यांनी पाच वर्षांत बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले असून आम्हाला ते सार्थकी लावायचे आहे. आपल्यासमोर आव्हाने आहेत. देशात १० लाख सरकारी शाळा आहेत. खासगी शाळा चांगल्या असतील तर सरकारी शाळाही चांगल्या असायला हव्या. तरच आपण शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा उद्देश साध्य करू शकू, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)महाराष्टÑातील २५ शिक्षक-शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व आदर्श कामगिरीसाठी शिक्षकदिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील २५ शिक्षकांचा समावेश आहे. त्यातल्या १७ प्राथमिक शिक्षकांपैकी दोन शिक्षकांना व आठ माध्यमिक शिक्षकांपैकी एका शिक्षकाला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय पदक, प्रमाणपत्र व ५० हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.नागपूरच्या शंकरनगर येथील मूक बधिर शाळेच्या शिक्षिका डॉ. मीनल सांगोळे यांना विशेष श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सुरेश शिंगणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव चिमलखा, पो. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा (बुलडाणा), राजेशकुमार फाटे ए.टी., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगाव पंचायत समिती लाखनी (भंडारा), अमीन चव्हाण, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निंभा, देऊ रवाडा,ता.दिग्रस, (यवतमाळ) यांना प्राथमिक शिक्षकांच्या श्रेणीत पुरस्कृत करण्यात आले. राष्टÑीय पुरस्कार विजेत्या माध्यमिक शिक्षकांमध्ये संजय नारलवार, मुख्याध्यापक, प्रियंका उच्च माध्यमिक शाळा, कानेरी, ता. गडचिरोली यांचा समावेश आहे.आॅपरेशन डिजिटल बोर्डपंतप्रधान डिजिटल इंडियाबाबत बोलत आहेत. कालपर्यंत आम्ही आॅपरेशन ब्लॅकबोर्डबद्दल बोलत होतो, मात्र आता येत्या पाच वर्षांमध्ये आॅपरेशन डिजिटल बोर्ड साकार होत आहे. दीक्षा प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून देण्यात आला आहे. आता शिक्षकांना यू ट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येईल, असे जावडेकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Teacherशिक्षक