शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ११ जखमी, रस्त्याच्या कडेला पडल्याने मोठी हानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 07:40 IST

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात रविवारी मुख्य बाजाराजवळील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, ज्यात किमान ११ नागरिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात रविवारी मुख्य बाजाराजवळील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, ज्यात किमान ११ नागरिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असताना या हल्ल्याने खळबळ उडाली आहे.

टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळील ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन केंद्राजवळ एका अत्यंत संरक्षक संकुलाच्या जवळ हा हल्ला झाला. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या खानयारमधील महत्त्वाचा पाकिस्तानी कमांडरचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बंकरवर ग्रेनेड फेकले. मात्र, ग्रेनेड रस्त्याच्या कडेला पडले. यात ११ जण जखमी झाले. हा स्फोट आठवडी बाजाराजवळ झाला, जो रविवारचा बाजार म्हणून ओळखला जातो, जिथे हजारोंची गर्दी असते. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली आणि दुकानदारांची धावपळ झाली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

आजपासून अधिवेशन- सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि चरार-ए-शरीफचे सात वेळा आमदार अब्दुल रहीम राथेर हे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे पहिले सभापती होण्याची शक्यता आहे. _ जम्मू व काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना होण्याच्या एक वर्ष आधी, २०१८च्या सुरुवातीला झालेल्या शेवटच्या सत्रासह सोमवारी सहा वर्षांहून अधिक कालावधीनंतर सभागृहाची बैठक होईल. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला