शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान ११ शेतकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 04:54 IST

सरकारला आणखी किती बळी हवे - राहुल गांधी

चंदिगड/नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट करून मागील १७ दिवसांच्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ११ शेतकऱ्यांची छायाचित्रांसहित यादी दिली आहे. त्यांनी त्यावर भाष्य करताना म्हटले की, ‘कृषी कायदे हटविण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती आहुत्या द्याव्या लागतील?’राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत जोडलेल्या एका पत्रकवजा टिप्पणात म्हटले आहे की, ‘१७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर सरकार आणि शेतकरी यांच्यातील वाटाघाटींतून तोडगा निघण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. टिकरी आणि सिंघू सीमेवर ११ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. राहुल गांधी यांनी ११ मृत शेतकऱ्यांची यादी छायाचित्रांसह दिली आहे. छायाचित्रांच्या यादीतील १२वी चौकट त्यांनी रिक्त ठेवून म्हटले आहे की, ‘हे प्रभू, ही चौकट रिक्तच राहू दे.’कडक सुरक्षेतही बंद केले टोल नाके पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात शनिवारी अनेक टोल नाके बंद केले. कुठेही अनुचित घटना होऊ नये, म्हणून दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यांतील टोल नाक्यांवर पोलिसांचे सुरक्षा कडे तयार केले होते. आंदोलनाच्या सतराव्या दिवशीही शेतकऱ्यांमध्ये उत्साह कायम आहे. सिंघू सीमेवर तिन्ही कायद्यांची ट्रॅक्टरवर वरात काढण्यात आली. भारतीय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नोएडा येथे मुंडन केले. महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही ७०० शेतकऱ्यांसह दिल्ली सीमेवर धडक दिली. शुक्रवारी पलवल इथे पोलिसांनी अडवले असता, त्यांनी मोदी सरकारच्या विरोधी घोषणाबाजी केली.