शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

११ सदोष विमानांवर उड्डाणबंदीचा निर्णय, दोन कंपन्यांना सरकारचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 04:45 IST

ज्यात प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कंपनीची सदोष इंजिने बसविलेली आहेत अशा एअरबस-३२० निओ प्रकारच्या विमानांचा देशात प्रवासी वाहतुकीसाठी वापर बंद करण्याचा आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोमवारी दिला.

नवी दिल्ली : ज्यात प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी कंपनीची सदोष इंजिने बसविलेली आहेत अशा एअरबस-३२० निओ प्रकारच्या विमानांचा देशात प्रवासी वाहतुकीसाठी वापर बंद करण्याचा आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सोमवारी दिला. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.यापैकी आठ सदोष विमाने इंडिगो कंपनीकडे तर तीन विमाने गोएअर कंपनीकडे आहेत. प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनीची पीडब्ल्यू ११०० मॉडेलची ४५० पुढील क्रमांकाची सुटी इंजिने उपलब्ध असली तरी ती विमानांना बसवून त्यांचा वापर करू नये, असेही महासंचालनालयाने या दोन कंपन्यांना कळविले आहे.हे सदोष इंजिन ऐनवेळी बंद पडण्याची आणखी एक ताजी घटना घडल्यानंतर कोणताही धोका न पत्करण्याच्या उद्देशाने याइंजिनांची सर्वच विमाने वापरातून काढून घेण्याचे ठरविण्यात आले. इंडिगो कंपनीचे अहमदाबादहून लखनऊसाठी निघालेले एअरबस-३२० निओ विमान सोमवारीसकाळी इंजिनातील बिघाडामुळे अहमदाबादला परत आणावेलागले होते.>अपघातांचा धोकाया इंजिनांमधील दोष लक्षात येताच तशी इंजिने असलेली विमाने वाहतुकीसाठी न वापरण्याचा इशारा युरोपच्या नागरी विमान वाहतूक प्राधकरणाने ९ फेब्रुवारी रोजी प्रथम दिला. त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ज्यात दोन्ही इंजिने अशा प्रकारची आहेत अशा तीन विमानांचा वापर बंद करण्यास इंडिगो कंपनीला सांगितले. मात्र ज्यांत दोनपैकी एक इंजिन सदोष आहे, अशा विमानांचा वार सुरु ठेवला गेला होता. परंतु वापर सुरु ठेवलेल्या अशा विमानांची इंजिने उड्डाणापूर्वी किंवा भर उड्डाणात ऐनवेळी बंद पडम्याच्या घटना गेल्या महिनाभरात लागोपाठ घडल्यानंतर संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन आता अशा सर्वच विमानांचा वापर बंद करण्यात आला आहे.