शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या मुलाने ‘भावी अधिकाऱ्यां’ना गंडविले; महागडे शौक पूर्ण करण्यासाठी पेपर लीकच्या नावाने केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 06:10 IST

सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) तुषार सिंह यांनी सांगितले की, राजस्थानमधील १०वीत शिकणाऱ्या  १६ वर्षीय विद्यार्थ्याने ‘टेलीग्राम’वर एक चॅनेल तयार केला.

इंदूर : मध्य प्रदेश नागरी सेवा परीक्षेतील पेपर लीक झाल्याचा दावा करत राजस्थानमधील दहावीच्या विद्यार्थ्याने महागडे शौक पूर्ण करण्यासाठी अनेक उमेदवारांची फसवणूक केली आहे.

सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) तुषार सिंह यांनी सांगितले की, राजस्थानमधील १०वीत शिकणाऱ्या  १६ वर्षीय विद्यार्थ्याने ‘टेलीग्राम’वर एक चॅनेल तयार केला. त्यावर त्याने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या दि. २३ जूनच्या राज्यसेवा परीक्षेच्या प्राथमिक फेरीचे पेपर प्रत्येकी २,५०० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा केला होता. यात त्याने यूपीआय पेमेंट करण्यासाठी एक क्यूआर कोडही दिला होता.

नेमके काय केले?

nसिंह म्हणाले की, राज्य सेवा परीक्षेचा पेपर मिळविण्याच्या लालसेने या क्यूआर कोडद्वारे कोणी पेमेंट करताच, विद्यार्थी त्या खरेदी करणाऱ्याचा मोबाइल नंबर ब्लॉक करत असे. या पद्धतीने फसवणूक करून विद्यार्थ्याने अनेक उमेदवारांची फसवणूक केली.

nसर्वात आश्वर्याची बाब म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे राज्यसेवा परीक्षेचा पेपरच नव्हता आणि त्याने फसवणूक करण्यासाठी पेपर लीक झाल्याचा खोटा दावा केला.

फसवणूक कशी करायची यू-ट्यूबवर शिकला

एसीपी म्हणाले की, दहावीतील विद्यार्थ्याने यू-ट्यूबवर ऑनलाइन फसवणूक कशी करायची याच्या पद्धती शिकून घेतल्या.

लोकांना फसविलेल्या पैशातून त्याला महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा छंद पूर्ण करायचा होता.

जूनमध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात विद्यार्थ्याला सीआरपीसी अंतर्गत नोटीस देण्यात आली असून, फसवणूक प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.

विद्यार्थ्याने नीट फॉर्म विकण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती आणि या प्रकरणाचा तपास सीबीआय राजस्थान पोलिसांच्या मदतीने करत असल्याचे एसपींनी सांगितले.