शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१0८ रुग्णवाहिका कर्मचारी १८ पासून संपावर

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

पणजी : जीव्हीएमके इएमआरआयच्या व्यवस्थापनाकडून कामावर सतावणूक करण्यात येते. याबाबत राज्य सरकार, तसेच आरोग्यमंत्र्यांना वारंवार सांगूनही समस्येवर तोडगा काढण्यात येत नसल्याने १0८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचार्‍यांनी बुधवार १८ फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे.

पणजी : जीव्हीएमके इएमआरआयच्या व्यवस्थापनाकडून कामावर सतावणूक करण्यात येते. याबाबत राज्य सरकार, तसेच आरोग्यमंत्र्यांना वारंवार सांगूनही समस्येवर तोडगा काढण्यात येत नसल्याने १0८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचार्‍यांनी बुधवार १८ फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे.
रुग्णवाहिकेची सेवा अत्यावश्यक असल्याचे भान आम्हाला आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून आमच्यावर होणारा मानसिक त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. सरकारकडे याची तक्रार करूनही दखल न घेतली जात असल्याने आम्हाला संप पुकारावा लागत असल्याचे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बुधवारी १८ रोजी सर्व रुग्णवाहिका व्यवस्थापनाकडे सुपूर्द केल्या जातील. त्याचप्रमाणे कर्मचार्‍यांना देण्यात येणारे मोबाईल फोनही व्यवस्थापनाकडे देण्यात येईल. त्यानंतर पणजी आझाद मैदानावर एकत्र येऊन कर्मचारी व्यवस्थापनाविरोधात निदर्शने करतील. तर १९ रोजी आरोग्य संचालनालयाच्या इमारतीकडे धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही सरकारने व व्यवस्थापनाने आमच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले नाही, तर कर्मचारी साखळी उपोषणाला बसतील. कर्मचार्‍यांच्या सतावणुकीबरोबरच नोकरीचा प्रश्न असून आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत उपोषण करण्याची तयारीही कर्मचार्‍यांनी दाखविली आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारने यापूर्वी अत्यावश्यक सेवा कायदा १0८ रुग्णवाहिका सेवेसाठी लागू केला आहे. तरीही आंदोलन करण्यासाठी १0८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी ठाम आहेत. (प्रतिनिधी)