शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

100 वर्षीय वृद्धेला मुलाने काढलं घराबाहेर, 85 वर्षीय मुलीने दिला आसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 08:57 IST

चारबाग रेल्वे स्टेशनवर एक 100 वर्षीय महिला एका एनजीओला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती.

ठळक मुद्देचारबाग रेल्वे स्टेशनवर एक 100 वर्षीय महिला एका एनजीओला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. 100 वर्षीय महिलेचा आसरा अजून कोणी नाही तर त्यांची 85 वर्षीय मुलगी झाली. 

लखनऊ- चारबाग रेल्वे स्टेशनवर एक 100 वर्षीय महिला एका एनजीओला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. ऑक्टोबरमध्ये मुलाने 100 वर्षीय आईला घराबाहेर काढलं होतं. वृद्धांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओला ही महिला सापडल्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा तपासकरून त्या महिलेला राहण्यासाठी जागा मिळवून दिली. या 100 वर्षीय महिलेचा आसरा अजून कोणी नाही तर त्यांची 85 वर्षीय मुलगी झाली. 

1 ऑक्टोबर रोजी एनजीओने त्या महिलेला बलरामपूर हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांची ओळखही त्या सांगू शकत नव्हत्या. हॉस्पिटलमध्ये 15 दिवस उपचार केल्यानंतर त्यांनी त्यांची ओळख सांगितली. चंपा असं त्यांचं नाव असून त्या वाराणसीच्या आहेत. 

वृद्ध महिलेचं फक्त नाव समजलं होतं. त्यापलिकडे त्यांची काहीही ओळख समजली नव्हती. म्हणूनच एनजीओने सोशल मीडिया आणि रेडिओच्या माध्यमातून महिलेच्या घरच्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लखनऊमध्ये राहणाऱ्या पुष्पा या त्यांच्या मुलीशी संपर्क साधला. चंपा यांची मुलगी पुष्पा लखनऊच्या दलिगंजमध्ये राहणारी आहे. 

शनिवारी पुष्पा त्यांचा मुलगा मुकेशसह त्यांच्या आईला भेटण्यासाठी बलरामपूर हॉस्पिटलमध्ये पोहचल्या. आईची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर मुकेशने मुद्दाम मामाला फोन केला आणि आजीबरोबर बोलायचं असल्याचं सांगितलं. पण चंपा यांच्या मुलाने पीडित वृद्ध महिला आजारी असून ती कोणाशी बोलू शकत नसल्याचा बनाव केला. मामाचा खोटारडे पणा उघड करण्यासाठी मुकेशने हॉस्पिटलमध्ये असलेल्या आजीचा व्हिडीओ तयार करून तो मामाला पाठवला. चंपा यांच्या मुलाने त्यांच्याशी नातं तोडत त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं होतं. एक महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर 100 वर्षीय पुष्पा यांना त्यांच्या 85 वर्षीय मुलीने आसरा दिला.