शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चोपड्यात कारमधून १०० तलवारी जप्त

By admin | Updated: February 17, 2016 23:47 IST

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरात सापळा रचून एका कारमध्ये असलेल्या १०० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवारी रात्री ११ वाजेनंतर ही कारवाई झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरात सापळा रचून एका कारमध्ये असलेल्या १०० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवारी रात्री ११ वाजेनंतर ही कारवाई झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील भावसार गल्लीत मुस्तफा दर्ग्याजवळ राहणारा मुकेश मोहनलाल शर्मा हा त्याच्या (जीजे १२ पी ९६०९) क्रमांकाच्या कारमधून तलवारी आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबर्‍याने दिली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी सहायक पोलीस निरीक्षक मुश्ताक अली सैय्यद, हेड कॉन्स्टेबल उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, विजय पाटील, पोलीस नाईक ईश्वर सोनवणे, शिपाई योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील, बबन तडवी यांचे पथक तयार करून चोपड्याला पाठवले. या पथकाने भावसार गल्लीत सापळा लावला होता. मुकेश शर्मा रात्री ११ वाजेच्या सुमारास गाडीसह त्याच्या घरी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता, तिच्या मागील सीटवर तीन पोत्यांमध्ये एकूण १०० तलवारी आढळल्या. या तलवारींची किंमत सुमारे ५० हजार रुपयांच्या घरात आहे. म्हणून पोलिसांनी मुकेशला अटक करून त्याला चोपडा शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
राजस्थानहून विक्रीसाठी आणल्या तलवारी
मुकेश याने या तलवारी विक्रीच्या उद्देशाने राजस्थान राज्यातील सिरोही येथून आणल्या आहेत. राजस्थानहून घरी परत येतांना शिरपूरमार्गे तो चोपड्याला आला. आर्थिक फायद्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. काही महिन्यांपूर्वी नरडाणा पोलिसांनीदेखील मध्यप्रदेशातून आणलेल्या तलवारींसह दोघांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे या प्रकारात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय
पोलिसांच्या ताब्यात असलेला मुकेश शर्मा हा मूळचा राजस्थानातील रहिवासी आहे. मात्र, तीन पिढ्यांपासून त्याचे कुटुंबिय चोपड्यात राहत असून त्याचे वडील आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय करतात. तो वडिलांना व्यवसायात मदत करतो. त्याच्याविषयी अधिक माहिती काढली जात आहे.