शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी उतरणार १०० विमाने, ३० डिसेंबरला पंतप्रधान करणार विमानतळाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:28 IST

- त्रियुग नारायण तिवारी लोकमत न्यूज नेटवर्क अयोध्या : अयोध्येत बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० डिसेंबर ...

- त्रियुग नारायण तिवारीलोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : अयोध्येत बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० डिसेंबर रोजी उद्घाटन करणार आहेत. या शहरात रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान रामाच्या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्या दिवशी निमंत्रितांना घेऊन अयोध्या विमानतळावर सुमारे १०० विमाने येण्याची शक्यता आहे. त्यांच्या वाहतूक नियोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

अयोध्या शहराला आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रात खास ओळख मिळावी यासाठीही उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३० डिसेंबरच्या दौऱ्यात अयोध्येत ते अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचादेखील समावेश राहणार आहे. तसेच त्यांची त्या दिवशी जाहीर सभादेखील होणार आहे. 

त्या शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या बांधकामाच्या प्रगतीचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका बैठकीत आढावा घेतला. रामपथ, भक्तिपथ, जन्मभूमी पथ, धर्मपथ तसेच अयोध्या विमानतळाच्या बायपासपासून नयाघाट भागाला जोडणाऱ्या रस्त्याचे, रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम किती पूर्ण झाले आहे, याचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. 

संपूर्ण अयोध्या राममयनरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा लक्षात घेऊन ते सारे शहर सुशोभित करण्याचे योगी आदित्यनाथ सरकारने ठरविले आहे. त्यासाठी विकासकामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. या दौऱ्यानंतर काही दिवसांनी भगवान रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे.त्यानिमित्त देशभरातून अनेक मान्यवर या शहरात येणार आहेत. संपूर्ण अयोध्या राममय झाल्याचे चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहावे, असा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा प्रयत्न आहे.

या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळी व नंतरही अयोध्या शहर अत्यंत स्वच्छ असावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्या शहरातील नगरनिगममध्ये सध्या ३ हजार सफाई कर्मचारी आहेत. त्यांची संख्या ५ हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

अयोध्या पर्यटनाचा डिजिटल नकाशा तयार करणारnअयोध्येचा डिजिटल स्वरूपातील पर्यटन नकाशा विकसित करण्यात येणार आहे. nत्यात तेथील प्रमुख ठिकाणे व सुविधांची माहिती असेल, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३० डिसेंबर रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सभेला दीड ते दोन लाख लोक येण्याची शक्यता आहे.nया लोकांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याचे तसेच सभेला आलेल्या लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ