शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Medical Colleges: २०२७ पर्यंत १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये, केंद्राचा प्रस्ताव; ६० टक्के निधीही देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 07:03 IST

Medical Colleges: जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून २०२७ सालापर्यंत देशभरात १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य खात्याच्या विचाराधीन आहे. या महाविद्यालयांमुळे देशातील आरोग्य क्षेत्राला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. 

नवी दिल्ली : जिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून २०२७ सालापर्यंत देशभरात १०० नवीन वैद्यकीयमहाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य खात्याच्या विचाराधीन आहे. या महाविद्यालयांमुळे देशातील आरोग्य क्षेत्राला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. 

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने एक योजना अमलात आणली आहे. तिच्या चौथ्या टप्प्यात देशभरात १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी ३२५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्aयातील ६० टक्के निधी केंद्र सरकार व ४० टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. ईशान्य भारतातील राज्ये व विशेष दर्जा असलेल्या राज्यांमध्ये या योजनेकरिता केंद्राकडून ९० टक्के व राज्याकडून १० टक्के रक्कम दिली जाईल. या योजनेच्या आधीच्या तीन टप्प्यांत देशात १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार होती. त्यातील ९३ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. इतर महाविद्यालयांचे बांधकाम काही कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

महाविद्यालय नसलेल्या जिल्ह्यांसाठी योजनाn ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या प्रत्येकी १० लाखांपेक्षा अधिक आहे व जिथे खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा १०० जिल्ह्यांमध्ये १०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. n केंद्र सरकारच्या योजनेच्या आधीच्या तीन टप्प्यांत मंजूर झालेल्या १५७ वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून नर्सिंग महाविद्यालयेही सुरू करण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक नर्सिंग महाविद्यालयाकरिता केंद्र सरकार १० कोटींचा निधी देणार आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयCentral Governmentकेंद्र सरकार