शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 06:37 IST

‘आम्ही कोरियाच्या महाराणींनाही आमंत्रित केले आहे, ज्या प्रभू श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा करतात,’ असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले. 

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह ५५ देशांतील सुमारे १०० प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांनी रविवारी सांगितले.रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना बोलावले आहे. ‘आम्ही कोरियाच्या महाराणींनाही आमंत्रित केले आहे, ज्या प्रभू श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा करतात,’ असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले. 

कोणत्या देशातून येणार प्रमुख पाहुणे? अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेलारूस, बोत्सवाना, कॅनडा, कोलंबिया, डेन्मार्क, डॉमिनिका, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), इजिप्त, इथिओपिया, फिजी, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, घाना, गयाना, हाँगकाँग, हंगेरी, इंडोनेशिया, आयर्लंड, इटली, जमैका, जपान, केनिया, कोरिया, मलेशिया, मलावी, मॉरिशस, मेक्सिको, म्यानमार, नेदरलँड, न्यूझीलंड, नायजेरिया, नॉर्वे, सिएरा लिओन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, स्पेन, श्रीलंका , सुरीनाम, स्वीडन, तैवान, टांझानिया, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वेस्ट इंडीज, युगांडा, यूके, यूएसए, व्हिएतनाम आणि झांबिया आदी राष्ट्रांचे राजदूत आणि प्रमुखांना आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

परदेशी पाहुणे २० जानेवारीलाच दाखल हाेणारसंघटनेचे आंतरराष्ट्रीय घडामोडी हाताळणारे विहिंपचे सहसरचिटणीस स्वामी विज्ञानानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व व्हीव्हीआयपी विदेशी प्रतिनिधी २० जानेवारीला लखनौला येतील. त्यानंतर २१ जानेवारीला सायंकाळपर्यंत ते अयोध्येला पोहोचतील. धुके आणि हवामानामुळे या कार्यक्रमापूर्वी प्रतिनिधींना भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे.

पुणेकराने काढला  प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त! पुणे : उत्तर प्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भारतातील ठरावीक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून, देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यामुळे या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात एका पुणेकर व्यक्तीचाही हातभार लागला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या