शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०० डॉक्टरांचे राजीनामे; देशभर सोमवारी काम बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 03:13 IST

कोलकात्यातील आंदोलनाचे लोण सर्वत्र : आरोग्यसेवेवर परिणाम

कोलकाता/नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांपूर्वी रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनी एका डॉक्टरला मारहाण केल्यानंतर सुरू झालेल्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन आता देशभर पसरले असून, महाराष्ट्र, बिहार, नवी दिल्ली, गोवा, झारखंडसह अनेक राज्यांतील डॉक्टर त्यात शुक्रवारी सहभागी झाले. आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत.

डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत प. बंगाल सरकार पुरेसे गंभीर नसल्याचा आरोप डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. सरकारच्या निषेधार्थ तब्बल १00 सरकारी वरिष्ठ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तसेच दिल्ली व अनेक राज्यांतील आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे सरकारने डॉक्टरांशी चर्चा करून लवकर तोडगा काढावा, असे कोलकाता हायकोर्टाने बंगाल सरकारला सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सरकारी डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, डॉक्टर आंदोलनावर ठाम आहेत.दरम्यान, या आंदोलनामागे भाजप व डावे पक्ष असल्याचा आणि बाहेरचे लोक यात घुसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी तेथील डॉक्टरांची मागणी आहे. याखेरीज रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा डॉक्टरांना पाहण्यास बॅनर्जी यांनी यावे व या हल्ल्याचा निषेध करावा, अशीही मागणी डॉक्टरांनी केली आहे. हल्लानंतर निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशीही मागणी डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांनी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, मुंबईतील डॉक्टरांनी डोक्यावर पांढरी पट्टी बांधून आंदोलन केले, तर दिल्लीतील डॉक्टरांनी हेल्मेट घातले होते. देशभर अनेक ठिकाणी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.ममता बॅनर्जीच जबाबदारदिल्लीतील डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली आणि डॉक्टरांच्या आंदोलनात तोडगा काढण्याची, तसेच डॉक्टर व रुग्णालयांना सुरक्षा देण्याची मागणी केली. आरोग्यमंत्र्यांनी या आंदोलनाला ममता बॅनर्जी याच जबाबदार असल्याचा आरोप केला.कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील केइएम रूग्णालयात डॉक्टरांनी रुग्णांप्रमाणे पट्ट्या बांधून आंदोलन केले. 

टॅग्स :doctorडॉक्टरMamata Banerjeeममता बॅनर्जीkolkata-dakshin-pcकोलकाता दक्षिण