शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: १०० कोटी डोस: देशाच्या आत्मनिर्भरतेचा विजय- डॉ. व्ही. के. पॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:49 IST

वेळेत पूर्ण होईल जगातील सर्वांत मोठे लसीकरण - डॉ. व्ही. के. पॉल

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : भारताने १०० कोटी लसमात्रा देऊन मोठा टप्पा गाठला असला तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. लसीकरणाचा हा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन व दूरदृष्टीचा विजय आहे. लसीकरणामुळे आमची समूह प्रतिकारशक्ती वाढली आहे, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘७५ टक्के प्रौढ व्यक्तींना कमीत कमी एक, तर ३० टक्के लोकांना दुसरी मात्रा दिली गेली आहे. २५ टक्के लोकांना अजून एकही मात्रा दिली गेलेली नाही.’लसीकरणात कोणती आव्हाने आहेत, असे विचारल्यावर पॉल यांनी प्रारंभी भ्रम आणि ठरवून विरोधात केलेला प्रचार होता, असे म्हटले. लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्यावर जनतेत आत्मविश्वास वाढला. दुसरे आव्हान लस पुरवठ्याचे होते. आता दरमहा कोव्हॅक्सिनचे पाच कोटी आणि कोविशिल्डच्या २२ कोटी मात्रा मिळत आहेत. कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी कधी मिळेल, या प्रश्नावर त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी ‘डब्ल्यूएचओ’ची बैठक होणार असून मंजुरी मिळेल, अशी आशा असल्याचे म्हटले. मुलांच्या लसीकरणासाठी आमच्याकडे जाइकोव-डी (१२-१८ वर्षांच्या मुलांसाठी) लस आहे. तिच्यावर अभ्यास सुरू आहे, असे ते म्हणाले. भारताने अनेक देशांना लसीसाठी शब्द दिला आहे, या प्रश्नावर पॉल म्हणाले, जेव्हा आमची गरज भागेल तेव्हा जगाच्याही गरजा भागवू. १०० कोटी लस मात्रा दिल्या. आता मास्कमधून कधी सुटका मिळेल, या प्रश्नावर पॉल यांनी सध्या तरी त्यातून सुटका नाही, असे स्पष्ट केले. मास्क गरजेचाचकोणी सोबत असताना मास्क वापरणे गरजेचे आहे. दोन मात्रांनंतरही काळजी घ्यावी लागेल. चूक केल्यास पश्चात्ताप होईल; कारण विषाणूने रूप बदलले तर जास्त संकट निर्माण होऊ शकते; म्हणून आम्हाला सावध राहावे लागेल. काही महिने जाऊ द्या; कारण त्यानंतर एक नवी पहाट होणार आहे, असेही पॉल म्हणाले.हे तर अभूतपूर्व...भारत मोठा लस उत्पादक होता; परंतु, पहिल्यांदा लसीच्या विकासासाठीही परिचित झाला, असे सांगून पॉल म्हणाले, हे अभूतपूर्व आहे. कोव्हॅक्सिन पूर्णपणे भारताची लस आहे. दुसरी एमआरएनए लस, डीएनए लस भारतातच विकसित झाली. नेजल लसही भारतात बनेल. याशिवाय कोविशिल्ड, स्पुतनिक आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लसही भारतात बनत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या