शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:40 IST

पाकने रिकामी केली सीमेवरील गावे । दोन देशांतील तणावामुळे अमेरिकेला चिंता

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच, केंद्र सरकारने काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १00 तुकड्या पाठविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सुमारे १0 हजार जवान तिथे निघाले आहेत. जवानांना घाईघाईने पाठविण्याचे कारण केंद्राने स्पष्ट केलेले नाही.

ही पथके रवाना होत असतानाच काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याला शुक्रवारी अटक केली. काश्मीर खोऱ्यातून १५0 हून अधिक फुटिरवादी नेते व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. जमात-ए-इस्लामीच्या अनेकांनाही अटक झाली आहे.

पाकिस्ताननेही सीमेवरील गावे अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला असून, त्या ठिकाणी लष्करातर्फे बंकर उभारण्याची सुरुवातही केली आहे. भारतातर्फे पाकिस्तानवर हल्ला होईल, अशी भीती त्या देशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील सभेत म्हणाले की, पुलवामाचा बदला कसा घ्यायचा, हे लष्कराला माहीत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर १00 तासांच्या आत हल्ल्याला मदत करणाºयांना जिथे पाठविणे गरजेचे होते, तेथे जवानांनी धाडले आहे. लष्कराला सरकारने पूर्ण मोकळीक दिली आहे. पाकिस्तानविरोधी लढ्याचे सारे मार्ग आम्ही खुले ठेवल्याचे अर्थमंत्री जेटली यांनीही नमूद केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर भारत व पाकमधील परिस्थिती खूपच बिघडल्याचे म्हटले आहे. हे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये जे ४0 जवान शहीद झाले, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. रवाना होणाऱ्या निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफच्या ४५ तुकड्या असून, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या ३५ तुकड्या, तसेच सीमा सुरक्षा बलच्या १0 आणि इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या १0 तुकड्या आहेत.

३५ अ चा निकालकाश्मीरविषयीच्या राज्यघटनेतील ३५ अ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणे अपेक्षित आहे. या कलमान्वये काश्मीरमध्ये जन्मलेली व्यक्तीच तेथील नागरिक असू शकते आणि तिथे मालमत्ता विकत घेऊ शकते. ते रद्द करावे, अशी याचिका न्यायालयात आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे काश्मीरमधील तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळेच निमलष्करी दलांना तिथे पाठविले असावे, अशी चर्चा सुरू आहे. भारत व पाकिस्तान तणाव वाढत असताना, काश्मीरमध्ये या निकालाने नवी समस्या उद्भवू नये, अशी केंद्राची इच्छा आहे.अन्नधान्ये व औषधांचा साठा करण्याचेही आदेशजम्मू-काश्मीर राज्य सरकारच्या आरोग्यसेवा संचालनालयानेही जिल्हा कार्यालयांना श्रीनगरच्या विभागीय औषध गोदामातून पाठवण्यात येणारी औषधे, गोळ््या, शस्त्रक्रियेची उपकरणे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. हे साहित्य सर्वत्र पोहचावे यासाठी श्रीनगरचे औषध गोदाम रविवारी, २४ रोजीही सुरु राहणार आहे. दक्षिण श्रीनगरच्या अन्न, नागरी पुरवठा संचालनालयाने अखत्यारितील सर्व कार्यालयांनाही लोकांना उपलब्ध अन्नधान्यांची विक्री तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. जनतेला विकत घेता यावे यासाठी विक्री केंद्रे व दुकाने रविवारी, २४ तारखेलाही सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान