शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

10 हजार कोटींचा काळा पैसा एकाच व्यक्तीचा

By admin | Updated: October 13, 2016 13:21 IST

हैदराबादमधील 13 हजार कोटी काळ्या पैशांतील 10 हजार कोटी हे एकाच व्यक्तीचे आहेत, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

आंध्र प्रदेश ,दि.13 - अघोषित उत्पन्न जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेत हैदराबादमध्ये 13 हजार कोटी रुपयांचा  काळा पैसा उघड करण्यात आला. या 13 हजार कोटी रुपयांमधील 10 हजार कोटी रुपये हे तर हैदराबादमधील एकाच व्यक्तीचे आहेत, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या दाव्याद्वारे त्यांनी राजकीय विरोधकांकडे आपला रोख ठेवल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारच्या दंड भरून काळा पैसा उघड करण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि शेवटच्या दिवशी देशभरातून 65 हजार कोटी रुपयांची कबुली देण्यात आली. यातील सर्वाधिक काळा पैसा हा हैदराबादमधील असून येथील 13 हजार कोटी रूपयांच्या अघोषित उत्पन्नाचा खुलासा झाला आहे.  मात्र यातील 10 हजार कोटी हे एकाच व्यक्तीचे असल्याचे धक्कादायक विधान चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे.  'ती व्यक्ती कोण आहे, हे या संदर्भातील गुप्ततेच्या कायद्यामुळे स्पष्ट होणार नाही. मात्र, एखादा उद्योजक इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती घोषित करण्याची शक्यता आहे का?', असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
येत्या काळातही अशाच योजना येतील. काळा पैसा असलेले 40 ते 45 टक्के दंड भरून मोकळे होतील आणि उरलेला पैसा पांढरा होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. यावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकणार नाही आणि सामाजिक कलंकही लागणार नाही, असे देखील नायडू यांनी यावेळी म्हटले. तसेच भ्रष्टाचारी आणि काळा पैसा कमावणा-यांसाठी राजकारण एक निवारा बनलाय, अशी खोचक टीका देखील त्यांनी केली. शिवाय, राजकारणात असलेले काही जण जनादेशाचा दुरुपयोग करत असल्याचेही नायडूंनी नमूद केले आहे. नायडूंनी असे वक्तव्य करुन विरोधकांना लक्ष्य केल्याचे मानण्यात येत आहे.
काळ्या पैशाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटा व्यवहारातून काढून घ्याव्यात अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बड्या नोट्या बंद झाल्या तर व्होट बँक विकत घेण्याची पद्धतही संपुष्टात येईल असे त्यांनी म्हटले आहे. घोषित उत्पन्न जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेत सर्वाधिक काळा पैसा असलेल्या शहरात हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली आघाडीवर आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत काळा पैसा जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. यातील निम्म्याहून अधिक रक्कम या तीन शहरातून आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.