शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी अग्निवीरांना बीएसएफमध्ये १० टक्के आरक्षण, शारीरिक क्षमता चाचणी हाेणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 06:29 IST

बीएसएफच्या भरती नियमांमध्येही करण्यात आले बदल.

नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) १० टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार बीएसएफच्या भरती नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत तसेच या भरतीसाठी माजी अग्निवीरांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही. ही माहिती केंद्रीय गृहखात्याने एका पत्रकात म्हटले आहे.

अग्निवीर सेवेत असताना पहिल्या किंवा त्यानंतरच्या कोणत्या तुकडीत कार्यरत होते याची माहिती घेण्यात येईल. त्यानुसार माजी अग्निवीरांना बीएसएफमध्ये भरती करताना त्यांच्या कमाल वयोमर्यादेची अट शिथील केली जाईल. यासंदर्भात केंद्रीय गृहखात्याने ६ मार्चला अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफमधील एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतील जवानांना बीएसएफमध्ये भरती होताना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळणार आहे.

अग्निपथ याेजनेचा झाला हाेता विराेध अग्निपथ ही मोहीम सुरू केल्यानंतर त्यावर काँग्रेस, डावे पक्ष आदी विरोधकांनी टीका केली होती. अशा भरतीचे लष्करावर वाईट परिणाम होतील, असे विरोधी पक्षांनी म्हटले होते. या योजनेबद्दल विविध राज्यांत निदर्शनेही झाली होती. मात्र, केंद्र सरकारने या टीकेकडे दुर्लक्ष करून अग्निपथ योजना अमलात आणली.

भरती नियमांत केले बदलमाजी अग्निवीरांच्या भरतीबाबत नियमांत केलेले बदल ६ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यानुसार त्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार नाही. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलHome Ministryगृह मंत्रालय