शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १३ पैकी १० ब्रॅण्ड मध शुद्धता चाचणीत नापास; सीएसईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 08:02 IST

१८ निकषांचे पालन करणे आवश्यक, बहुतेक ब्रॅण्डचे मध हे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेसोनान्स (एनएमआर) या शुद्धतेच्या चाचणीमध्ये नापास झाले. ही चाचणी जर्मनीतील एका प्रयोगशाळेत करण्यात आली.

नवी दिल्ली : देशातील १३ महत्त्वाच्या ब्रॅण्डपैकी १० ब्रॅण्डचे मध शुद्ध नसल्याचे सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हॉयरमेन्ट (सीएस‌ई) या संस्थेने शुद्धतेबाबत केलेल्या चाचणीत आढळून आले आहे.

शुद्ध स्वरूपातील मधासाठी १८ निकष लावण्यात येतात व ते उत्पादक कंपन्यांनी पाळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न नियंत्रण कायद्यात तशी तरतूद आहे. सीएसईने १३ ब्रॅण्डचे साध्या स्वरूपातील व प्रक्रिया केलेला असे दोन्ही स्वरूपातील मध निवडून त्यांची शुद्धता चाचणी घेतली. या ब्रॅण्डमध्ये डाबर, पतंजली, बैद्यनाथ, झंडू आदी नामांकित कंपन्यांचा समावेश होता. 

बहुतेक ब्रॅण्डचे मध हे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेसोनान्स (एनएमआर) या शुद्धतेच्या चाचणीमध्ये नापास झाले. ही चाचणी जर्मनीतील एका प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामध्ये सफोला, मार्कफेड सोहना, नेचर्स नेक्टर या तीन ब्रॅण्डचेच मध शुद्धतेच्या निकषांनुसार योग्य असल्याचे दिसून आले. देशांतर्गत विक्रीसाठी नव्हे तर मध जेव्हा निर्यात केला जातो तेव्हा त्याची एनएमआर चाचणी केली जाते.

मधामध्ये साखरेच्या पाकाची भेसळविविध ब्रॅण्डच्या मधामध्ये साखरेचा पाक बेमालूमरीत्या मिसळलेला असतो, असे सीएसईच्या अन्नसुरक्षा विभागाचे अधिकारी अमित खुराणा यांनी सांगितले. काही कंपन्या चीनमधून सिन्थेटिक स्वरूपातील साखरेचा पाक आयात करून तो मधात मिसळतात, असा धक्कादायक आरोप सीएसईने केला आहे. आमच्या मधामध्ये साखरेचा पाक मिसळलेला नसतो, असा दावा डाबर या कंपनीने केला आहे.