ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ३० - जम्मू- काश्मीरमधील कूपवाड जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून आणखी एक जण जखणी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात केरन सेक्टरमध्ये शनिवार सकाळपासून सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. तीन दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र यात एक जवान शहीद झाला. तर जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.