शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Homeguard Bharti: होमगार्ड भरतीसाठी फिजिकल टेस्ट देताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:55 IST

Odisha Home Guard Recruitment: ओडिशातील गजपती जिल्ह्यात गुरुवारी होमगार्ड भरतीदरम्यान दुर्दैवी घटना घडली

ओडिशातील गजपती जिल्ह्यात गुरुवारी होमगार्ड भरतीदरम्यान दुर्दैवी घटना घडली. शारीरिक चाचणीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भरती प्रक्रियेदरम्यान २ किमीच्या शर्यतीदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.

सुलंत मिशाल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गजपती जिल्ह्यातील रामगिरी पोलीस ठाणे परिसरातील परिसाल गावचा रहिवासी आहे. दरम्यान, होमगार्ड भरतीसाठी गुरुवारी सकाळी बेट्टागुडा परिसरात शर्यत आयोजित करण्यात आली होती, जिथे उमेदवारांना राणीपेठ ते पद्मपूर असा २ किमी अंतर गाठायचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलंत मिशालने शर्यत पूर्ण केली. परंतु, शर्यत संपल्यानंतर काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याला तातडीने परलाखेमुंडीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले. पाच जणांची प्रकृतीही बिघडली, त्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून इतर चार जणांवर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने इतर उमेदवारांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. भरती प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली. 

गजपतीचे एसपी जतिन पांडा म्हणाले की, "दोन महिन्यांपूर्वी १४४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या भरतीसाठी ४००० हून अधिक उमेदवारांनी आपली नावे नोंदवली. यातील १२०० हून अधिक उमेदवारांची नंतर निवड झाली. त्यासाठी शारीरिक चाचणी घेण्यात आली. पुरुष उमेदवारांना १० मिनिटांत आणि महिला उमेदवारांना १२ मिनिटांत २ किमीची शर्यत पूर्ण करायची होती."

टॅग्स :Odishaओदिशाjobनोकरी