शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हुतात्म्यांना १ कोटी, एकविसाव्या शतकात संयम आवश्यक - राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:59 IST

देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली.

मेरठ : देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली. पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात राजनाथ सिंह बोलत होते.एकविसाव्या शतकातील पोलिसांनी क्रूरपणे वागून चालणार नाही. पोलिसांनी सभ्यपणेच वागायला हवे आणि दंगली व निदर्शनांसारख्या आव्हानात्मक स्थितीचा सामना करताना, पोलिसांनी संयम ठेवायला हवा, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे शनिवारी केले.केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पोलीस दलांना आवाहन करताना, राजनाथ सिंग म्हणाले की, दंगली आणि निदर्शनांसारख्या परिस्थितीत गर्दीला नियंत्रित करण्यासाठीसंपूर्ण नवीन तंत्रज्ञान आणिमानसिक उपाययोजना करायला हव्यात. जात, धर्म आणि प्रादेशिकवाद या आधारे देशाला तोडू पाहणाºया शक्तींवर पोलिसांनी प्रभावी लक्ष ठेवायला हवा.राजनाथ सिंह म्हणाले की, आपण एकविसाव्या शतकात वावरताना पोलीस दलाने क्रूर असू नये. पोलिसांना सर्वांशी सभ्यपणच वागावे लागेल. सामान्यांपासून आंंदोलक असोत, संशयित असोत वा आरोपी, या सर्वांशी पोलिसांना चांगलीच वागणूक द्यायला हवी. कधी-कधी पोलिसांना कठोर व्हावे लागते, हे मी समजू शकतो. मात्र, अशा परिस्थितीतही संयम बाळगणे आवश्यक आहे.‘कमी कठोरता असलेला मार्ग शोधण्याच्या सूचना मी ‘ब्युरो आॅफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ला यापूर्वीच दिल्या आहेत,’ असेसांगून गृहमंत्री राजनाथ सिंहम्हणाले की, ‘सर्वच पोलिसांनी कमीतकमी बळाचा वापर करून अधिकाधिक परिणाम प्राप्त करायला हवा.’ (वृत्तसंस्था)राजनाथ सिंह म्हणाले की, द्रुत कृती दलाच्या सध्या १0 बटालियन कार्यरत आहेत. संवेदनशील असलेल्या १0 शहरांत त्या स्थापित आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना आता तयार गणवेश दिला जाणार नाही.त्याऐवजी १0 हजारांचा गणवेश भत्ता त्यांना दिला जाईल. सुरक्षा दलांतील १0 लाख जवानांना योग्य वेळी पदोन्नती मिळावी, यासाठी उपाय शोधण्यावर गंभीरपणे विचार केला जात आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह