शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना जि.प.ची ‘नो एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:20 IST

जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून स्पर्धात्मक पद्धतीने निविदा अंतिम केल्या जात असल्या, तरी गेल्या काही वर्षांत एकाच ठेकेदाराकडून कमी रकमेच्या निविदा भरून कामे घेण्याचे व निकृष्ट दर्जाची कामे करण्याचे प्रकार घडल्यामुळे, यापुढे निविदा भरताना ठेकेदाराकडे कोणतेही काम अपूर्ण नसल्याचा दाखला घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे.     

ठळक मुद्देबाळासाहेब क्षीरसागर : निविदा भरताना दाखला अनिवार्य

नाशिक : जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून स्पर्धात्मक पद्धतीने निविदा अंतिम केल्या जात असल्या, तरी गेल्या काही वर्षांत एकाच ठेकेदाराकडून कमी रकमेच्या निविदा भरून कामे घेण्याचे व निकृष्ट दर्जाची कामे करण्याचे प्रकार घडल्यामुळे, यापुढे निविदा भरताना ठेकेदाराकडे कोणतेही काम अपूर्ण नसल्याचा दाखला घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे.     मागील काळात जिल्हा परिषद स्तरावर ठरावीक मक्तेदार हे जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांसाठी २५ ते ३० टक्के कमी रकमेच्या निविदा भरून कामे घेत होते. विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश घेऊन ठरावीक मक्तेदार हे वर्षोनुवर्षे सदरची कामे प्रलंबित ठेवत असत. जिल्हा परिषदेची विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नोटिसा देऊनही विकास कामे पूर्ण होत नव्हती किंवा सदर विकास कामे केलीच, तर अंदाजपत्रकीय रकमेच्या कमी दराने कामे घेतल्यामुळे  सदर कामे निकृष्ट दर्जाची केली जात होती. परिणामी, नाशिक जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत करण्यात येणारी ग्रामीण भागातील विविध विकास कामे अपूर्ण किंवा होतच नसल्याचे निदर्शनास आले होते. अशा विकास कामांचे दायित्व वर्षेनुवर्षं राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक दायित्व निर्माण होत असल्याने, जिल्हा परिषदेस नव्याने विकास कामे हाती घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. ग्रामीण भागातील, अंगणवाडी बांधकाम, बंधारे, रस्ते व पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामीण जनता मूलभूत हक्कापासून वंचित राहत होती.  तसेच विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविताना उपभियंत्याच्या दाखल्याची अट कायम ठेवली असून, प्रशासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेत कुठलीही अनियमितता झालेली नसून, या संदर्भातील तक्रारी तथ्यहिन असल्याचेही अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी म्हटले आहे.निधी विहित वेळेत खर्च करण्याच्या सूचना प्रशासकीय स्तरावर कामकाज करत असताना, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांचा दर्जा व अपूर्ण राहणाऱ्या कामांची संख्या पाहता, विकास कामांचा निधी विहित वेळेत खर्च होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने विविध विकास कामांच्या निविदा भरताना, निविदा भरणाऱ्या मक्तेदाराकडे जिल्हा परिषदेचे यापूर्वीचे कुठलेही विकास काम पूर्ण करणे प्रलंबित नसल्याचा दाखला अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदPresidentराष्ट्राध्यक्ष