शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

जि.प. पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:21 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी राज्य सरकार विद्यमान पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यास राजी झाल्याचा दावा संबंधितांकडून केला जात असून, या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट घेतली आहे. मुदतवाढीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसरकार राजी : मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अवलंबून

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी राज्य सरकार विद्यमान पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यास राजी झाल्याचा दावा संबंधितांकडून केला जात असून, या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट घेतली आहे. मुदतवाढीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनात कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदा सध्या सत्ताधारी भाजपा-सेनेच्या ताब्यात आहेत, तर काही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू राजकीय परिस्थिती असल्यामुळे एकमेकांशी तडजोडी करून सामूहिक सत्तास्थापन करण्यात आलेली आहे.त्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जवळपास अडीच महिने कोणतेही भरीव कामकाज जिल्हा परिषदांमध्ये होऊ शकले नाही. जून व जुलै महिना वगळता आॅगस्टमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता असल्यामुळे पदाधिकाºयांना त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाप्रमाणे कमी महिनेच कामकाजासाठी मिळणार आहेत. त्याचा विचार करता सहा महिने मुदतवाढ दिल्यास पदाधिकाºयांना निवडणुकीच्या तोंडावर खूष ठेवता येणे शक्य होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्रीपंकजा मुंडे यांची भेट घेऊनउपरोक्त बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्या या मताशी राज्यकर्त्यांनीही सहमती दर्शविली असून, त्यासाठी अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा व त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात कायदा मंजूर करून घ्यावालागणार आहे.या संदर्भात नाशिक जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील उपरोक्त हालचालींना दुजोरा दिला असून, सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. तथापि, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र इन्कार केला आहे.सहा महिने मुदतवाढीसाठी विद्यमान पदाधिकाºयांचा आग्रहजिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असून, याच दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व रणधुमाळी असणार आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविल्यास त्यातून पक्षांतर्गत राजी-नाराजी उफाळून येण्याची व त्यातून सत्तेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाºया जिल्हा परिषदांच्या पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ दिली जावी, असा मतप्रवाह राज्यातील विद्यमान पदाधिकाºयांचा आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार